भारतात मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत.(Salary)व्यवसाय, सरकारी सुविधा आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक या सगळ्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. अशातच NHIDCL कडून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन नोकरीच्या संधी घेऊन आल्या आहेत.2025 साठी नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून उपव्यवस्थापक पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 34 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून त्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 4 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेले उमेदवार आणि 2023, 2024 किंवा 2025 मधील वैध GATE स्कोअर असणारे उमेदवार ग्राह्य धरले जातील. निवड ही GATE च्या स्कोअरवरून केली जाणार आहे. या पदांवर नेमले जाणाऱ्या उमेदवारांना 50,000 ते 1,60,000 पर्यंतचे वेतन दिले जाणार आहे.घोषित पदांसाठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या GATE स्कोअरवरून करण्यात येणार आहे. जर दोन उमेदवारांना सारखे गुण आले असतील तर उमेदवारांच्या जन्मतारखेनुसार निवड केली जाईल. ज्येष्ठ उमेदवारांना प्रथम संधी दिली जाणार आहे. (Salary)जन्मतारीख देखील सारखी असल्यास दहावीच्या प्रमाणपत्रावरील नावाच्या वर्णक्रमानुसार निवड होईल.
उपव्यवस्थापक या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय महामार्ग, बोगदे, रणनीतिक रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन करणे, डिझाईन करणे, अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण करणे अशी कामं असतील. (Salary)तसेच सरकारी धोरण आणि मानक यांचे व्यवस्थित पालन केले जात आहे का यावर लक्ष देणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली इतर कामे पार पाडणे उमेदवारांकडून अपेक्षित आहे.

भरतीसाठी लक्षात ठेवण्याच्या बाबी :
पद : उपव्यवस्थापक
रिक्त पद संख्या : 34
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (Salary)आणि GATE परीक्षा 2023, 2024, 2025 उत्तीर्ण
वेतनश्रेणी : 50,000 – 1,60,000 ₹
हेही वाचा :
‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,
नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?
समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला