मद्यपान करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र तरीही बहुतांशी लोक दारूचे सेवन करतात.(whiskey) बरेच लोक व्हिस्की आणि व्होडकामध्ये सोडा किंवा कोला ही पेये मिसळतात त्यामुळे धोका आणखी वाढतो. वाइन तज्ज्ञ सोनम हॉलंड यांनी हे शरिरासाठी किती घातक आहे यावर भाष्य केले आहे. त्यांच्या मते व्हिस्की आणि व्होडकामध्ये सोडा किंवा कोला मिसळला तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. कारण एक पेय दुसऱ्या पेयामध्ये मिसळल्याने त्याचा परिणाम बदलतो, यामुळे त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


वाइन तज्ज्ञ सोनम हॉलंड यांनी व्हिस्की आणि व्होडकामध्ये कोला किंवा सोडा मिसळण्यावर भाष्य केले आहे. (whiskey) त्यांनी म्हटले की, ‘कोला, सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स व्हिस्की आणि व्होडकामध्ये मिसळल्यास त्यामुळे शरीराला अल्कोहोल जलद शोषण्यास मदत होते, कारण हे पेय सेवन केले जाते तेव्हा ते रक्तात लवकर विरघळते आणि अल्कोहोलचे शरीरावर जलद परिणाम होतो. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी जास्त थकवा जाणवतो.

सोनम हॉलंड या पुढे बोलताना म्हणाल्या की, व्हिस्की असो किंवा व्होडका, जेव्हा कोला, सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स जोडले जातात तेव्हा ते पेय अधिक स्ट्राँग बनते, हे शरीरासाठी हानिकारक आहे.(whiskey) यामुळे शरीरात साखर आणि कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.सोनम हॉलंड यांनी म्हटले की, ‘काही लोक व्हिस्की आणि व्होडकामध्ये फळांचा रस टाकतात, अनेकांना वाटते की यामुळे नुकसान होणार नाही. मात्र हे चुकीचे आहे, कारण फळांच्या रसामध्ये साखर असते ज्यामुळे व्हिस्की आणि व्होडकाची चव बदलते. त्यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. वरील सर्व पदार्थांमुळे अल्कोहोलची मूळ चव कमी होते आणि त्याचा शरीरावरही घातक परिणाम होतो.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…