पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे.(Minister)पंतप्रधान मोदींनी आज युवा संवाद कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होता. या माध्यमातून त्यांनी बिहारमधील हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जवळपास ६२,००० कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. याचसोबत अनेक योजना देखील लाँच केल्या.

पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री स्वयं सहात्ता भत्ता योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे. (Minister)या योजनेअंतर्गत तरुणांना दर महिन्याला १००० रुपये दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत पाच लाख तरुणांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाणार आहे. दोन वर्षांसाठी हे पैसे दिले जाणार आहेत. याचसोबत त्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

पीएम मोदी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे.(Minister) या योजनेत तरुणांना ४ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यावर कोणतेही व्याजदर घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी हे कर्ज दिले जाते. यामुळे ३.९२ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत ७,८८० कोटींचे कर्ज दिले जाणार आहे.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…