Realme आपल्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त लवकरच एक अनोखा स्मार्टफोन (launch)सादर करणार आहे, जो बॅटरी आणि गरमीच्या समस्यांवर पूर्णत: तोडगा ठरू शकतो. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की २७ ऑगस्ट २०२५ रोजी ही नवीन डिव्हाइस सादर केली जाईल, ज्यामध्ये १५,०००mAh बॅटरीसह ‘चिल फॅन’ तंत्रज्ञान दिले गेले आहे. हा फोन एका चार्जवर अनेक दिवस चालेल, ज्यामुळे चार्जिंगचा ताण कमी होईल आणि यूजर्सना सतत चार्जिंगची चिंता करण्याची गरज राहणार नाही.

कंपनीच्या मते, फोन पूर्णपणे चार्ज केल्यानंतर तो साधारण चार दिवस चालेल. यामध्ये १८ तास व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५३ तास व्हिडिओ प्लेबॅक आणि ३० तास गेमिंग करता येईल. (launch)त्याचबरोबर, फ्लाइट मोडमध्ये फोन स्टँडबायवर तीन महिने टिकेल. यासाठी १००% सिलिकॉन एनोड तंत्रज्ञान वापरले गेले आहे, जे बॅटरीची कार्यक्षमता आणि दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे आहे.

रियलमी १५,०००mAh बॅटरी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ४ दिवस बॅटरी लाइफसह Pixel 10 Series Sale: गुगल पिक्सेल १० सिरीजची विक्री सुरू; मिळणार १० हजार रुपयांची सूट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमतबॅटरीसोबतच, या फोनमध्ये थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग तंत्रज्ञानासह एक लहान अंतर्गत पंखा देखील देण्यात आला आहे. (launch)हे तंत्रज्ञान सहसा बाह्य कूलिंग अॅक्सेसरीजमध्ये वापरले जाते, परंतु Realme ने ते थेट स्मार्टफोनमध्ये समाविष्ट करून डिव्हाइसचे कोर तापमान 6°C पर्यंत कमी करण्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानामुळे उच्च ग्राफिक्ससह गेमिंग करताना फोनचे कार्यप्रदर्शन अधिक स्थिर आणि परिणामकारक राहील.

हेही वाचा :

महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च…
वही हरवल्याने वडिल ओरडले, 7 वीच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल