पेन्शनधारकांसाठी (pensioners)ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य असल्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना कोषागार, बँक किंवा इतर कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन सरकारने आता जीवन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर केली आहे. उमंग अॅपसह अनेक ऑनलाइन सुविधांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत जीवन प्रमाणपत्र तयार करू शकता.

विशेष म्हणजे उमंग अॅप, बँक, पोस्ट ऑफिस आणि सार्वजनिक सुविधा केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधार क्रमांक, नोंदणी केलेला मोबाइल नंबर आणि बायोमेट्रिक/फेस अॅथेंटिकेशनच्या(pensioners) मदतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे पेन्शनधारकांची अडचण कमी होऊन पेन्शन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.
उमंग अॅप हे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने विकसित केलेले एकीकृत सरकारी सेवा अॅप असून, ‘जीवन प्रमाण’ ही सेवा त्यात उपलब्ध आहे. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून उमंग अॅप डाऊनलोड करा आणि त्यात ‘Jeevan Pramaan’ किंवा ‘Life Certificate’ ही सेवा शोधा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर टाका.
पडताळणीसाठी तुम्ही बायोमेट्रिक डिव्हाइस किंवा आधार फेस आरडी अॅप वापरू शकता. जर तुमच्याकडे बायोमेट्रिक मशीन नसेल, तर आधार फेस आरडी अॅप अधिक सोपा पर्याय आहे. या अॅपमध्ये तुमचा चेहरा कॅप्चर केल्यानंतर तुमचे जीवन प्रमाणपत्र त्वरित जनरेट होते आणि ते डिजीLocker मध्ये सेव्हही करता येते.
DigiLocker किंवा DigiTax सारख्या डिजिटल दस्तऐवज सेवांमध्ये जीवन प्रमाणपत्र सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही वेळेस ‘View Certificate’ पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक किंवा लाइफ सर्टिफिकेट आयडीद्वारे तुम्ही तुमचे प्रमाणपत्र पाहू शकता. हे सर्टिफिकेट बँक किंवा पेन्शन विभागाला ऑनलाइन सबमिट करता येते.
यामुळे ज्या पेन्शनधारकांना चालणे-फिरणे कठीण आहे, त्यांना कार्यालयात जाण्याची गरज राहत नाही. डिजिटल सुविधा वापरण्यासाठी सरकार वेळोवेळी जेष्ठ नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. शासनाच्या लेखा विभागानेही डिजिटल सर्टिफिकेट स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा
अजित पवारांच्या नातेवाईकांना ₹5,000,000,000चं BMC रुग्णालय…
महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी