बांगलादेशच्या राजकारणात खळबळ उडवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल जाहीर करत त्यांना फाशीची शिक्षा(Criminal) सुनावली. २०१८ ते २०२५ या काळात देशातील विद्यार्थी आंदोलनांवर झालेल्या हिंसक कारवाईत हसीना यांची थेट भूमिका असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर न्यायाधिकरणाने ही कठोर शिक्षा ठोठावली. न्यायालयानुसार शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हेलिकॉप्टरमधून बॉम्बहल्ल्यांचे आदेश हसीना यांनी दिले होते. तसेच अवामी लीगच्या कार्यकर्त्यांकडून सुनियोजित हल्ले घडवून आणण्यात आले, याचीही नोंद लवादानं आपल्या निर्णयपत्रात केली.

या प्रकरणात सरकारी वकिलांनी १,४०० आंदोलकांच्या मृत्यूसाठी हसीना यांना जबाबदार धरत मृत्यूदंडाची मागणी केली होती. मानवाधिकार संघटनांच्या अहवालांचे परीक्षण, उपलब्ध व्हिडिओ, साक्षीदारांचे जबाब आणि लष्करी अधिकाऱ्यांचे निवेदन या सर्वांचा अभ्यास करून न्यायाधिकरणाने ‘मानवतेविरुद्ध गंभीर गुन्हे’ सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, निकालाची संपूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड केली जात असून यामुळे अंतिम आदेश जाहीर होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला.

निकाल येण्याआधीच देशात तणाव वाढताना दिसला. ढाका आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन, जाळपोळ आणि तोडफोड झाल्याने सरकारने हिंसक आंदोलकांना दिसताक्षणी गोळी (Criminal)घालण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांनी आपल्या समर्थकांना पाठवलेल्या ऑडिओ संदेशात आरोपांना खोटे ठरवले आणि “न्यायालयाच्या निर्णयाची मला भीती नाही,” असे सांगितले.

ऑगस्ट २०२५ मधील उग्र आंदोलनांनंतर हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोहम्मद युनूस यांच्या सरकारने अवामी लीगवर बंदी घातली आहे. वाढत्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असून न्यायाधिकरणाचा हा निकाल निवडणूक वातावरणावर मोठा परिणाम घडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा
अजित पवारांच्या नातेवाईकांना ₹5,000,000,000चं BMC रुग्णालय…
महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी