“लोकांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. (administration)पाण्याचा वेग पाहता लष्काराला पाचारण केलेलं आहे. परिस्थिती प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे. जिवीतहानी होऊ नये, यासाठी जे जे करणं गरजेच आहे, ते ते केलं जात आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आज राज्यामध्ये गुंतवणूकी संदर्भात 17 करार आपण केले. या 17 कराराच्या माध्यमातून जवळपास 34 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे.
जवळपास 33 हजार नवीन रोजगारांची महाराष्ट्रात निर्मिती होईल” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “हे जे करार झाले आहेत, त्यातले पाच करार हे उत्तर महाराष्ट्रातील आहेत, 9866 कोटी रुपयांचे हे करार आहेत, यात नाशिकमध्ये, अहिल्यानगर, नंदुरबार येथे गुंतवणूक होणार आहे” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“पाच करार पुणे विभागाचे आहेत, यात 11,966 कोटींची गुंतवणूक आहे. 6 करार विदर्भाबाबत आहेत. यात 11642 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. (administration)गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. 3000 कोटीची गुंतवणूक रायगडमध्ये आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“वेगवेळया सेक्टरमध्ये ही गुंतवणूक येत आहे. इलेक्ट्रीक बस, ट्रक आहे इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, सोलर मॉड्यूल आहे. इतरही काही वेगवेगळ्या पद्धतीची गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही विकसिनशील योजना आहेत, टॅरिफ वॉर सुरु असताना महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणं, हा महाराष्ट्रावरचा विश्वास आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “उद्योग विभागाच्या माध्यमातून मैत्री पोर्टल तयार करुन उद्योजकांना डिजिटल अनुभव दिला. पुढे देखील अशीच गुंतवणूक पहायला मिळेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नांदेडमध्ये 500 नागरिक अडकलेले नांदेड येथे मुसळधार पाऊस सुरु आहे, 500 नागरिक अडकले आहेत, सरकारची तयारी काय? यावर सुद्धा फडणवीस यांनी उत्तर दिलं. “नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. जी काही वरच्या भागातली धरणं आहेत, त्यातून अधिक वेगाने पाणी सोडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे,
बाजूच्या राज्यांशी चर्चा केलेली आहे. लोकांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. पाण्याचा वेग पाहता लष्काराला पाचारण केलेलं आहे.(administration) परिस्थिती प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे. जिवीतहानी होऊ नये, यासाठी जे जे करणं गरजेच आहे, ते ते केलं जात आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :
भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक
एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स