तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (trinamool)यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मोईत्रा यांनी हे विधान भर सभेत केले आहे. आता भाजपा यावर नेमके काय उत्तर देणार? मोईत्रा यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? असे विचारले जात आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात उघड संघर्ष पाहायला मिळतो. निवडणुकीच्या काळात तर या दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते एकमेकांवर हल्ले करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. वैचारिक मदतभेदांमुळे या पक्षांतील शीर्षस्थ नेतेदेखील एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात.

दरम्यान, यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. त्यांच्या (trinamool) या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मोईत्रा यांनी हे विधान भर सभेत केले आहे. आता भाजपा यावर नेमके काय उत्तर देणार? मोईत्रा यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? असे विचारले जात आहे.
मोईत्रा नेमकं काय म्हणाल्या? महुआ मोईत्रा यांनी आपला भाषणात बोलताना अमित शाहा यांचा शिरच्छेद करून त्यांचे शिर टेबलावर आणून ठेवायला हवे, असे विधान केले आहे. त्या भारतात केल्या जाणाऱ्या घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलत होत्या. घुसखोरी थांबवण्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. “ते फक्त घुसघोर..घुसखोर असं बोलताना दिसत आहेत.
आपल्या सीमांचे रक्षण करणारी जी संस्था आहे ती संस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारित येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून आंदोलन केले. या भाषणात त्यांनी घुसखोरांमुळे लोकसंख्येत मोठी वाढ होत आहे, असे विधान त्यांनी केले. पंतप्रधान हे विधान करत असताना समोरच्या रांगेत बसलेले केंद्रीय गृहमंत्री टाळ्या वाजवत होते,” असे मोईत्रा म्हणाल्या.

अगोदर अमित शाहा यांचे… तसेच, “भाराताच्या सीमेचे रक्षण करणारे कोणीही नाही. दररोज अन्य देशातून शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येने घुसखोरी होत आहे. आपल्या माता-भगिनींवर वाकडी नजर टाकली जात आहे. आपल्या जमिनी बळकावल्या जात आहेत. असे असेल तर अगोदर तुम्ही अमित शाहा यांचे शिर धडापासून वेगळे करून (trinamool) टेबलावर ठेवायला हवे,” असेही मोईत्रा म्हणाल्या.
भाजपा नेमकी काय भूमिका घेणार? देशातील रोहिंगे आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशातून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून सध्या ऑपरेशन पुशबॅक चालू केले आहे. सरकारकडून ही कारवाई केली जात असताना आता मोईत्रा यांनी वरील विधान केले आहे. त्यांनी आपल्या भाषणातून बीएसएफवरच प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, आता शाहा यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर आता भाजपा नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक
एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स