मासिक पाळी हे स्त्रियांच्या निरोगी आरोग्याचे वरदान आहे.(amount) या काळात स्त्रियांचे शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होत असते. मासिक पाळीचे चक्र साधारणतः 21 ते 35 दिवसांचे असते. मासिक पाळी येणे म्हणजे स्त्रियांचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होत असते. प्रत्येक महिन्यात गर्भाशयाचे आतील आवरण जाड होते आणि अंडाशयातून एक स्त्रीबीज बाहेर पडते. जर गर्भधारणा झाली नाही तर, गर्भाशयाचे जाड आवरण आणि स्त्रीबीज रक्तस्त्रावाच्या स्वरूपात बाहेर पडते. यादरम्यान प्रत्येक स्त्रीला कमी-जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. पण प्रमाणापेक्षा अधिक रक्तस्त्राव होत असेल तर, याचा आोरोग्यावर परिणाम होतो. आणि थकवा येणे, चक्कर येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा रक्तस्त्राव नेमका किती प्रमाणात व्हायला हवा याबाबात प्रत्येक स्त्रीला माहीत असणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाचे सरासरी प्रमाण 30 ते 40 मिली इतके असते.(amount) सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हे प्रमाण दोन ते तीन चमचे असावे. काही संशोधनानुसार 60 मिलीलीटर हे प्रमाण सुमारे चार चमचे असू शकते. मासिक पाळीच्या रक्तात श्लेष्मा, फॅलोपियन नलिकांचे आवरण आणि इतर ऊती देखील असतात. एकूण रक्तस्त्रावामध्ये सुमारे 36 टक्के रक्त आणि 64 टक्के इतर घटक असतात. जर मासिक पाळी दरम्यान तुम्ही सॅनीटरी पॅड ऐवजी मेंस्ट्रुअल कप वापरत असाल तर, किती प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे हे मोजता येऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर एकूण रक्तस्त्राव 120 मिली असेल तर त्यापैकी 36 टक्के रक्त असते. म्हणजेच त्यातील 120 मिलीपैकी 43 टक्के रक्त असेल. याप्रमाणे जर मासिक पाळी दरम्यान तुमच्या रक्तस्त्रावातील रक्ताचे प्रमाण 60 मिली किंवा 80 मिली असेल तर, जास्त रक्तस्त्राव झाल्याचे मानले जाऊ शकते.

तुमच्या शरीरात लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 12 यांसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता जाणवल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात लोह आणि व्हिटॅमिन के युक्त आहाराचा समावेश करा. (amount)हिरव्या भाज्या, लाल मांस किंवा चिकन या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 12 साठी पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्यांसह अंड्यांचेही सेवन करा. तसेच अळशीच्या बिया, फळे आणि संपूर्ण धान्यांचेही सेवन करा. भरपूर पाणी प्या ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा कमी होईल. याशिवाय अधिक समस्या जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार

एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral

हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!