बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी Video

गुजरातमधील अहमदाबाद येथे दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान विद्यार्थिंनीचा(student) मृत्यू झाला. ही वेदनादायक घटना शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज तपासासाठी पाठवले आहे.

ही घटना नवरंगपुरा परिसरातील सोम ललित शाळेची आहे. गुरुवारी घडलेल्या या दुःखद घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास लॉबीमध्ये चालत असताना बोटांमध्ये चावी फिरवत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अचानक रेलिंगवरुन उडी मारल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. सदर घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे.

शाळेत जेवणाची सुट्टी सुरू असताना ही घटना घडली. विद्यार्थिनीने(student) उडी मारल्यानंतर शाळेत खूप आरडाओरडा झाला. वर्गातील विद्यार्थी रेलिंगकडे धावले. शिक्षिकाही बाहेर आले. पण कोणालाही काहीच समजले नाही. उडी मारल्यानंतर विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली, ज्यामध्ये डोक्याला खोल दुखापत आणि हात आणि पायांच्या हाडांमध्ये फ्रॅक्चरचा समावेश होता. तिला ताबडतोब जवळच्या निधी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. नंतर कुटुंबीयांनी तिला थलतेज येथील दुसऱ्या रुग्णालयात हलवले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले – विद्यार्थिनीच्या(student) आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. आम्ही घटनेबद्दल अधिक माहिती गोळा करत आहोत. सध्या आम्हाला कोणताही घातपात असल्याचा संशय नाही, तरीही आम्ही सर्व पैलू तपासत आहोत. तिने हे पाऊल का उचलले यावर भाष्य करणे घाईचे आहे.

शाळेचे व्यवस्थापक प्रज्ञेश शास्त्री म्हणाले, विद्यार्थिनी गेल्या पाच वर्षांपासून शाळेत शिकत होती, अलीकडेच ती एका महिन्याच्या सुट्टीनंतर १० दिवसांपूर्वी शाळेत परतली. तिने शाळेत वैद्यकीय प्रमाणपत्र देखील सादर केले होते. विद्यार्थिनीच्या वडिलांनी सकाळी तिला शाळेत सोडले होते. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वर्ग सुरू असताना ती अचानक ओरडू लागली. शिक्षिकेने तिला शांत केले.

नवरंगपुरा पोलिसांनी या प्रकरणी वैद्यकीय-कायदेशीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दुसरीकडे, विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे.

हेही वाचा :

कोणाला किती टक्के? सब घोडे बारा टक्के…!

बचतीसोबत मिळवा संरक्षण, LIC च्या ‘या’ विमा पॉलिसी जाणून घ्या

मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर नाराज, अनेकांना डच्चू मिळणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत