८ व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल होणार(concept)असल्याची आणि महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जाणार असल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी पूर्णपणे असत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्र सरकारने स्वतः या दाव्याची सत्यता स्पष्ट करत, सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले आहे.लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, सध्याचा महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही आणि या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

या स्पष्टीकरणामुळे, देशभरातील ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी(concept) आणि ६९ लाख पेन्शनधारकांसाठी व्हायरल होणाऱ्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा केला जात होता की, ८ वा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे आणि त्यासाठी DA-DR महागाई मदत मूळ वेतनात विलीन करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे.

पीएफ कपातीचा टक्का वाढेल.
मूलभूत वेतन वाढल्याने आयकर (concept)वाढू शकतो.
महागाई भत्त्याची स्वतंत्र वाढ थांबेल नेहमीची ४-५% वाढ मिळणार नाही.
पगार वाढीचा एकूण वेग कमी होईल.

८ वा वेतन आयोग २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
DA महागाई भत्ता आणि मूळ वेतन विलीन करण्याचा (concept)कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारलेला नाही.
सध्याच्या नियमांनुसार DA ची गणना महागाई निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी पूर्वीप्रमाणेच होत राहील.
या सरकारी स्पष्टीकरणानंतर, DA आणि बेसिक पे मर्ज होणार असल्याचा दावा करणारी व्हायरल बातमी पूर्णपणे असत्य ठरली आहे.

हेही वाचा :

गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या

कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द

‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEditEdit