बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावातील ३४ वर्षीय बुडन खान होसमनी (Ugargol village) सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी पारंपरिक अन्नाचा त्याग करून केवळ झाडांचा पाला खाऊन जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला आहे. गावाबाहेरील हेग्गोळ नावाच्या डोंगराळ भागात ते एकांतात वास्तव्यास असून त्यांची जीवनशैली पाहण्यासाठी अनेक जण उत्सुकतेने भेट देत आहेत.

दहा वर्षांपूर्वी घरच्यांकडून लग्नासाठी (Ugargol village) होणाऱ्या आग्रहामुळे त्यांनी घर सोडले आणि डोंगरात आश्रय घेतला. तिथे राहात असताना त्यांनी वानरांना झाडांची पाने खाताना पाहिले आणि त्यातूनच त्यांनी स्वतःही पानांवर जगण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ही केवळ तात्पुरती सवय होती, मात्र कालांतराने तीच त्यांची जीवनशैली बनली.
बुडन खान दररोज सकाळी झाडांचा ताजा पाला खातात आणि त्यानंतर पचन सुरळीत (Ugargol village) व्हावे यासाठी कठीण योगासने करतात. भूक लागली की ते वानरांप्रमाणे झाडावर चढून पाने तोडतात. विशेष म्हणजे केवळ पानांवर जगूनही त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा स्थानिक नागरिक करतात. त्यामुळेच गावकऱ्यांनी त्यांना ‘आधुनिक टार्जन’ अशी उपाधी दिली आहे.
त्यांच्या या अनोख्या जीवनपद्धतीमुळे वैद्यकीय (Ugargol village) क्षेत्रातही उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ झाडांच्या पानांवर इतकी वर्षे कसे जगता येते, याबाबत अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या जीवनशैलीची जोरदार चर्चा सुरू असून काही जण त्यांचे कौतुक करत आहेत, तर काही जण आरोग्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त करत आहेत. मात्र बुडन खान आपल्या निवडलेल्या मार्गावर ठाम असून निसर्गाशी एकरूप होऊन जगण्यातच त्यांना समाधान मिळत असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी