घरातील गृहिणींसाठी सर्वात मोठी चिंता आणि भीतीची गोष्ट म्हणजे घरात येणारे झुरळ. (forever)घरातील कोपर्‍यांमध्ये, कपड्यांच्या कपाटामध्ये आणि विशेष म्हणजे स्वयंपाक घरात झुरळांचा जास्त वावर पहायला मिळतो. झुरळ शक्यतो दमट वातावरण आणि अस्वच्छता असलेल्या ठिकाणी येतात. त्यांना घरातून पळवण्यासाठी अनेक प्रकारचे स्प्रे, लक्ष्मण रेखा आणि इतर औषधांचा वापर केला जातो. पण तरीही झुरळांना बाहेर काढणे किंवा त्यांचा नायनाट करणे कठीण होते. ज्या घरात जास्त झुरळ असतात त्या घरात आजारपणाला खुले आमंत्रण असते. त्यामुळे तुमच्या घरातही झुरळांनी उच्छाद मांडला असेल तर यावर वेळीच उपाय करून त्यांना त्वरीत बाहेर काढले पाहिजे. पण यासाठी तुम्हाला आता कोणत्याही औषधाची गरज नाही, कारण फक्त 5 रूपयांना मिळणाऱ्या लिंबाचा वापर करून तुम्ही झुरळांना तुमच्या घरापासून कायमचे दूर करू शकता.

झुरळांना लिंबाच्या तीव्र वासाचा आणि त्यामध्ये असलेल्या सायट्रिक अ‍ॅसिडचा खूप त्रास होतो. (forever)त्यामुळे ते लिंबाच्या संपर्कात येणे टाळतात. घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी लिंबाचा वापर करणे हा एक सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. तसेच लिंबामध्ये नैसर्गिक अँटिबायोटिक गुणधर्म असल्यामुळे कोणत्याही रसायनाची आवश्यकता नसते. त्यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तिला विशेषतः लहानमुलांना त्याचा त्रास होण्याची शक्यता नसते.

झुरळांचा नायनाट करण्यासाठी लिंबाचा वापर कसा कराल?

  1. लिंबाच्या रसाची फवारणी करा:
    यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये अर्धा कप पाण्यात 2 ते 3 लिंबांचा रस मिसळा आणि स्प्रे तयार करा. या स्प्रेच्या मदतीने कॅबिनेट, सिंकखाली, कोपर्‍यात आणि फर्निचर मागे फवारणी करा. दर आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवसांनी पुन्हा फवारणी करा.
  2. लिंबाची साल ठेवा:
    घरात ज्या ठिकाणी झुरळांचा वावर असतो त्या ठिकाणी लिंबाच्या साली ठेवा. 3 ते 4 दिवसांनी साली बदलत रहा.
  3. फरशी पुसण्याच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा:
    घराची फरशी पुसताना किंवा स्वयंपातघराची स्वच्छता करताना पाण्यामध्ये काही प्रमाणात लिंबाचा रस मिसळा. यामुळे देखील झुरळांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
  4. लिंबू आणि बेकिंग सोडा:
    एका लहान भांड्यात बेकिंग सोडा आणि थोडा लिंबाचा रस एकत्र मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण घरात ज्या ठिकाणी जास्त झुरळ दिसतात तिकडे पसरवा.(forever) हे मिश्रण झुरळांच्या पोटात गेल्यास त्यांच्या पोटात गॅस निर्माण होऊन ते मारले जातात.
  5. लिंबाच्या तेलाची फवारणी:
    लेमन एसेंशियल ऑइलचे 10 थेंब, 2 कप पाणी आणि थोडे लिक्विड डिशवॉश एकत्र मिसळा. घरात झुरळ असणाऱ्या ठिकाणी फवारणी करा. हा उपाय सर्वात प्रभावी ठरतो.

याशिवाय अधिक प्रभावी आणि दुप्पट परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसामध्ये कॉफी पावडर, (forever)लवंग किंवा पुदिन्याची पाने मिसळून वापरू शकता. यासोबतच तुमच्या घरात अस्वच्छता राहणार नाही याची काळजी घ्या. 15 दिवसातून एकदा तरी घराची साफ-सफाई आणि महत्त्वाचे म्हणजे महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल नक्की करा.

हेही वाचा :

बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! तगडा स्पर्धक घराबाहेर

किडलेले दात आणि अन्न अडकण्याच्या समस्येवर डॉक्टर सांगतात ‘हे’ प्रभावी उपाय!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा ‘बॉम्ब’? 8व्या वेतन आयोगाची नवीन संकल्पना; DA चा फॉर्म्युला बदलणार!