कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

युक्रेनशी युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचे अध्यक्षब्लादिमीर पुतीन(warning) हे प्रथमच दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. अमेरिकेसह अनेक देशांचे लक्ष पुतीन आणि नरेंद्र मोदीयांच्या भेटीकडे आणि ते करणार असलेल्या भाषणाकडे लागले होते. या दोन नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ कार्ड अप्रत्यक्षरीत्या अडगळीत टाकले होते. भारताला येथून पुढे अखंडितपणे इंधन पुरवठा केला जाणार असल्याची हमी पुतिन यांनी दिल्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक सामर्थ्यशाली झाली असल्याचे स्पष्ट झाली आहे.कोणत्याही देशाचा अध्यक्ष भारत दौऱ्यावर आला तर त्याच्या स्वागतासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी जायचे असते. आणि कोणत्याही देशाचा पंतप्रधान आला तर त्याच्या स्वागतासाठी भारताच्या पंतप्रधानांनी जायचे असते. हा राजशिष्टाचार आहे. पण रशियाचे अध्यक्ष ब्लादेमीर पुतीन यांच्या स्वागतासाठीप्रोटोकॉल बाजूला ठेवून नरेंद्र मोदी हे त्यांच्या स्वागतासाठी पालम विमानतळावर गेले होते. तर ब्लादिमीर पुतीन यांनीही प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारमधून प्रवास केला.


टेरिफ कार्ड वरून अमेरिकेचे अनेक देशांशी असलेले संबंध दुखावले गेले आहेत. (warning)सर्वाधिक यांनी भारतावर लावले आहे. भारताने रशियाकडून इंधन खरेदी करू नये यासाठी ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणण्याचा एक भाग म्हणून सर्वाधिक आयात शुल्क लावले आहे. रशियाकडून इंधन खरेदी व्यवहारात थांबवा असा दमच त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिला होता.पण गुरुवारी केलेल्या भाषणात त्यांनी भारत हा कोणाच्याही दबावाखाली राहणारा देश नाही. भारत हा आता बदलला आहे. तू कोणाच्या अटी शर्थी खाली काम करत नाही. आम्ही आमच्या अटी लावून परदेशांशी व्यापार व्यवहार करत असतो. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खणखणीत शब्दात इशारा दिला आहे. रशियाशी आमचे व्यापार संबंध चालू राहतील. रशियाकडून आम्ही इंधन खरेदी करतच राहू असा संदेशही त्यांनी ट्रम्प यांना दिला आहे.ब्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अस्वस्थ झाले आहेत.

पुतीन यांनी भारताशी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत केल्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश येथे (warning)आपली लुडबुड चालणार नाही. हे ट्रम्प यांच्या आता लक्षात आले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोघेजण अधिक जवळ आले आहेत आणि या दोघांनाही ट्रम्प यांनी जवळ केल्याचे चित्र काही महिन्यात निर्माण झाले आहे. या दोघांच्या माध्यमातून भारताला अप्रत्यक्षरित्यादबावा खाली आणण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असफल झाला आहे.रशियाने अर्थात ब्लादेमीर पुतीन यांनी युक्रेनशी अकारण युद्ध छेडल्यामुळे, निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.याबद्दल पुतीन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कायद्याखाली खटला दाखल करण्यात आला आहे. आणि त्यांना वॉन्टेड म्हणून जाहीर केले आहे. (warning)ब्लादिमीर पुतीन हे ज्या देशांमध्ये जाऊ शकतात तेथील प्रमुखांना पुतीन तुमच्या देशात आले तर त्यांना अटक करावी असे आदेशच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कायद्याखाली देण्यात आले आहेत. त्यामुळे भारत दौऱ्यावर असलेल्या किंवा आलेल्या पुतीन यांच्या विषयी जगभर उत्सुकता आणली गेली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दबाव झुगारून भारताने पुतीन यांचे भव्य दिव्य स्वागत केले होते.

रशिया हा भारताचा गेल्या अनेक वर्षापासून चा भरवशाचा मित्र आहे. (warning)भारतावर आलेल्या कोणत्याही संकटाच्या वेळी रशिया मदतीसाठी धावून आला आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावरून भारताची पाठ राखण करत आला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या 75 वर्षाच्या कालखंडात रशिया हा भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे. पहलगाम दहशतकांडानंतर भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले होते तेव्हा रशियाने भारताला जोरदार समर्थन दिले होते. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचा अधिकार आहेअशी प्रतिक्रिया पुतीन यांनी त्यावेळी दिली होती.जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्ध झाले तेव्हा तेव्हा रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहिला होता हा इतिहास आहे. इंधन, वायु आणि कोळसा हे भारताच्या ऊर्जा विकासासाठी आवश्यकआहेत आणि त्याचा पुरवठादार हा रशिया आहे.


आता पुतीन यांच्या दोन दिवसांच्या भारत भेटीत भारत आणि रशिया (warning)यांच्यातील व्यापार 100 अब्ज डॉलरवर नेण्याचा दोन्ही राष्ट्र प्रमुखांनी निर्धारच केलेला नाही तर तसा करारही केला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी रशिया हा कायम भारताला मदत करेल किंवा या प्रमुख मुद्द्यावर दोन्ही देश एकमेकाला सहाय्य करतील असे रशियाकडून अधोरेखित करण्यात आलेले आहे.युक्रेन्सी युद्ध घोषित केल्यानंतर ब्लादेमीर पुतीन हे सहसा देशाबाहेर दौऱ्यावर जात नाहीत. अगदी क्वचित प्रसंगी आणि अपरिहार्य कारणामुळे त्यांचे परदेश दौरे होतात. या पार्श्वभूमीवर पुतीन यांचा दौरा दोन महिन्यापूर्वी निश्चित झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कमालीचे अस्वस्थ झालेले दिसतात. गेल्या दोन महिन्यात त्यांनी भारताला दबावाखाली आणण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते असफल ठरले. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री संबंध दिवसेंदिवस दृढ होत असल्याचे पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना आता त्यांच्या भारतविषयक धोरणात बदल करावा लागेल. कारण ब्लादिमीर पुतीन यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण देऊन नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला चांगलेच फटकारले आहे

हेही वाचा :

चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा

महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?

वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी