कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

भारतातील काही भागांसह काही देशांना गेल्या आठ दिवसात (poverty)”दितवाह”चक्रीवादळाने अक्षरशः झोडपून काढले आहे. श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया या देशात या चक्रीवादाने हा:हा:कार उडवला आहे. अनेक शहरे उध्वस्त केली आहेत. या जल संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने श्रीलंकेला जी मदत पाठवली आहे, तिचे तपशील पाहिल्यानंतर पाकिस्तानची जगभर अब्रू रसातळाला गेली आहे.राजा उदार झाला अशा अविर्भावात पाकिस्तानी श्रीलंकेला तातडीची मदत म्हणून काही रसद पाठवली आहे. त्यामध्ये औषधे, अन्नपदार्थ आहेत. आणि ती एक्सपायर झालेली आहेत.

म्हणजे खाण्यासाठी आणि शरीरासाठी उपयुक्त नाहीत अशी औषधे आणि अन्नपदार्थाची पाकिटे पाहिल्यानंतर श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांना कपाळावर हात मारून घ्यावा लागला.(poverty) विशेष म्हणजे अशा प्रकारची गैर उपयोगी मदत श्रीलंकेला पाठवण्यासाठी भारताने आपली हवाई सीमा पाकिस्तानसाठी चार तास रिलीज केली होती. हवाई हद्दीचा वापर करून देण्यासाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी भारताकडे परवानगी मागितली होती. मानवतेच्या भूमिकेतून भारताने आपली भारतीय हवाई सीमा पाकिस्तानच्या विमानांसाठी तातडीने रिलीज केली होती.

अशाच प्रकारे इंडोनेशियाला तातडीची मदत म्हणून भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई सीमा काही तासांसाठी हवी होती.मात्र तेव्हा पाकिस्तानी ही मागणी मान्य केली नव्हती. (poverty)भारतीय हवाई हद्दीतून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर जलसंकटात सापडलेल्या श्रीलंकेला मदत पाठवली जाणार आहे असे भारताला वाटले होते. प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानच्या या तातडीच्या मदतीचा पोल खोल झाला. मदत पाठवली पण ती श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी बाजूला ठेवली आणि पाकिस्तानच्या संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगून अप्रत्यक्षरीत्या त्यांची बेइज्जत केली. पाकिस्तान हाच मुळे भिके कंगाल झाला आहे. तेथील जनतेला उपासमारीला तोंड द्यावे लागते आहे.

पाकिस्तानचे सरकार तेथील सर्वसामान्य जनतेला अत्यावश्यक सेवा म्हणून अन्नधान्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात आणि रास्त दरात करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. (poverty)आणि ती संपूर्ण जगाला माहित आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही मानवतेचे पुजारी आहोत. उपासमारी आणि दैन्य आम्हाला पाहावत नाही असा देखावा तयार करण्यासाठी पाकिस्तानने श्रीलंकेला मदत पाठवली पण जगभर नाचक्की करून घेतली. तुर्कस्तानने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला संकटकाळी म्हणून सर्व प्रकारची मदत पाठवली होती. पाकिस्तान हा तुर्कीचा जवळचा मित्र आहे.काही महिन्यापूर्वी झालेल्या भारताने पाकिस्तान यांच्यातील अघोषित युद्धात तुर्कीने पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. शस्त्रास्त्रे पाठवली होती.

मात्र याच तुर्कस्तानात महाभयंकर भूकंप झाला तेव्हा पाकिस्तानने तुर्कस्तानला जी मदत पाठवली होती, (poverty)ती कधीकाळी तुर्कस्ताननेच पाकिस्तानला पाठवलेली होती. यावरून पाकिस्तानची सध्या हालत काय आहे हे स्पष्ट होते.श्रीलंका हा भारताचा जवळचा देश आहे. दोन्ही देशांच्या संस्कृतीमध्ये विलक्षण साम्य आहे. या देशात “दितवाह”चक्रीवादळाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक शहरे जलमय झाली आहेत. शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. भारताने तातडीने श्रीलंकेला भरपूर मदत पाठवली आहे आणि आणखी तितकीच मदत पाठवली जाईल असे त्या देशाच्या सत्ताधाऱ्यांना आश्वासित केले आहे.विशेष म्हणजे भारताने ही मदत पाठवताना कोणत्याही प्रकारची उपकाराची भावना ठेवलेली नाही.

हेही वाचा :

बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! तगडा स्पर्धक घराबाहेर

किडलेले दात आणि अन्न अडकण्याच्या समस्येवर डॉक्टर सांगतात ‘हे’ प्रभावी उपाय!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा ‘बॉम्ब’? 8व्या वेतन आयोगाची नवीन संकल्पना; DA चा फॉर्म्युला बदलणार!