कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मंगळवारी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत या(celebration) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. मतदानाच्या निमित्ताने राज्यातील अनेक मतदान केंद्र परिसरात जे काही घडले ते अभूतपूर्व असे होते. वास्तविक मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो, मात्र मंगळवारी उभ्या महाराष्ट्राने उत्सव नव्हे तर लोकशाहीचा तमाशा पाहिला असे खेदाने म्हणावे लागेल. ग्रामपंचायती पासून ते थेट लोकसभेपर्यंतच्या निवडणुका होत असतात. त्यासाठी मोठ्या उत्साहाने आणि चुरशीने मतदान होते. मतदार यादीत नाव नसणे, असले तरी ते चुकीचे असणे, जिवंत मतदाराला मृत ठरवणे, बोगस मतदान,कार्यकर्त्यांमधील वादावादी असे प्रकार या निमित्ताने घडत असतात.

सर्वसामान्य जनतेने ते अपेक्षितही धरलेले असते. (celebration) पण मंगळवारी निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील काही भागात जे काही घडले तो नक्कीच बिन पैशाचा तमाशा होता. आणि तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येत नाही. पण हिंगोली चे आमदार संतोष बांगर हे हातामध्ये मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्या आधी तिथे एक महिला मतदान करत असताना तिच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी स्वतः मतदान केले आणि त्याचे मोबाईल मध्ये फोटो काढले. मतदान केंद्रामध्येच एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा दिली. हिंगोली पोलीस ठाण्यात आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले आहे.
एका मतदान केंद्रावर एका तरुणांने बोगस मतदान केले.(celebration) त्याला काही कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने त्या बोगस मतदारास पळून जाण्यासाठी मदत केली. हे सुद्धा पहिल्यांदाच घडले. मतदान केंद्राच्या बाहेर हातामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन एक कार्यकर्ता खुर्चीवर आराम बसला होता. मतदान केंद्राच्या बाहेर असलेले पोलीस त्या कार्यकर्त्याकडे पाहतात पण त्याला तेथून हटकत नाहीत.बघ्याची भूमिका घेतात. हे सुद्धा पहिल्यांदा घडले आहे. धनसावंगी मतदान केंद्रातील मतदान यंत्र फोडून टाकण्याचा प्रकार घडला. तर धुळे येथे पोलिसांनी 50 हजार रुपयांची रोकड मतदान केंद्र परिसरातच जप्त केली.
हे सुद्धा पहिल्यांदाच घडलेले आहे.गडहिंग्लज येथे माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी आणि विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात वादावादी झाली. रायगड मध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नेता यांच्यात राडा झाला. हा प्रकार पोलीस अगदी हतबल होऊन पाहत होते. (celebration) मालवण मध्ये विद्यमान मंत्री नितेश राणे आणि त्यांचेच ज्येष्ठ बंधू शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्याकार्यकर्त्यांमध्ये हातघाई झाली. वातावरण कमालीचे तप्त बनले होते. धुळे, बीड, माजलगाव, गेवराई, जळगाव, मालवण, हिंगोली, रायगड, अकलूज, पिंपळनेर, बुलढाणा, गडहिंग्लज, यवतमाळ, घनसावंगी, नागपूर, अशा अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर अनुचित प्रकार घडले.
फक्त मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला नाही इतकीच समाधानाची बाब आहे.फार पूर्वी असे प्रकार बिहार आणि उत्तर प्रदेश येथे व्हायचे. गावगुंडांकडून मतदान केंद्रच ताब्यात घेऊन मतदान केले जायचे. महाराष्ट्रातील काही भागात मात्र मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून असे गंभीर प्रकार घडले. महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या इतिहासात इतके गैरप्रकार पहिल्यांदाच घडलेले आहेत.मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान यंत्रे शासकीय इमारतीमध्ये
तीन स्तरीय पोलीस बंदोबस्तात ठेवली आहेत. यंदा प्रथमच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांच्या बरोबरीने उपस्थित राहण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

त्यामुळेच बुधवारी नागपूर येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या इमारतीमध्ये एक अधिकारी गेला असल्याचे कार्यकर्त्यांनी पाहिले. (celebration) त्यानंतर तेथे परिस्थिती गंभीर बनली. जिथे मतदान यंत्र ठेवलेली आहेत तेथे कोणासही प्रवेश नसतो. तर मग हा अधिकारी तिथे कसा काय पोहोचला? निवडणूक हा तसा लोकशाहीचा उत्सव समजला जातो. कारण अशा प्रकारच्या उत्सवातून लोकप्रतिनिधी नावाची एक व्यवस्था प्रस्थापित होत असते. पण मंगळवारी राज्यातील काही मतदान केंद्रावर सर्वसामान्य जनतेला लोकशाहीचा उत्सव नव्हे तर बिन पैशाचा तमाशा पाहायला मिळाला. पैशाचा प्रचंड प्रभाव या निवडणुकीत
पहिल्यांदाच ठसाठशीतपणे दिसला.
हेही वाचा :
बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! तगडा स्पर्धक घराबाहेर
किडलेले दात आणि अन्न अडकण्याच्या समस्येवर डॉक्टर सांगतात ‘हे’ प्रभावी उपाय!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा ‘बॉम्ब’? 8व्या वेतन आयोगाची नवीन संकल्पना; DA चा फॉर्म्युला बदलणार!