कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (results)राज्यभर मोठ्या चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. पण आपण निकाल मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने 18 दिवस लांबणीवर पडला आहे. आता दिनांक 21 डिसेंबर रोजी एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. निर्धारित वेळेप्रमाणे बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती आणि त्यासाठी प्रशासनाने तयारी सुद्धा केली होती. मात्र आता या तयारीवर पाणी फेवले आहे. निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाने प्रथमच हस्तक्षेप केल्यामुळे शंका आणि कुशंकांना रान मोकळे झाले आहे.

मंगळवारी राज्यभरातील 264 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. (results)न्यायालयाने काही संस्थांच्या निवडणुका दिनांक 20 डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.ठरल्याप्रमाणे दिनांक 3 डिसेंबर रोजी मंगळवारी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी झाली असती आणि निकाल जाहीर झाले असते तर त्याचा प्रभाव उर्वरित संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानावर होऊ शकतो. म्हणून निवडणुकांचे निकाल आता दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. बुधवारच्या मतमोजणीचे नियोजन ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने अर्थात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखिखाली बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते.

परिपूर्ण तयारी करण्यात आली होती. आता ही तयारी वाया गेली आहे. (results)उच्च न्यायालयाच्या या आदेशाने राज्यभर खळबळ उडाली होती. अचानक झालेल्या या बदलामुळे काही राजकीय मंडळींनी शंका आणि कुशंका व्यक्त केल्या आहेत. आधीच ईव्हीएम मशीन बद्दल संशयाचे वातावरण आहे. दिनांक 21 डिसेंबर रोजी महायुतीच्या बाजूने, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदारांचा कौल स्पष्ट झाला तर पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन बद्दल तक्रारी केल्या जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच फार उशिरा झालेल्या आहेत.

निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर केल्यानंतर (results)बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 21 जानेवारी रोजी अंतिम निर्णय दिला जाईल असे घोषित केले आहे. त्यामुळे दिनांक 21 डिसेंबर रोजी सर्वच निकाल जाहीर झाले तरी काही संस्थांच्या निवडणूक निकालांवर सर्वोच्च न्यायालयाचे टांगती तलवार असणार आहे. कारण न्यायालय निवडणूक वैध आहे की अवैध आहे हे ठरवणार आहे.सहसा एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर त्यामध्ये उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.

किंवा हस्तक्षेप करण्यास नकार दिला जातो. (results)आधीच लांबलेल्या निवडणुकीमध्ये मात्र न्यायालयाने दुसऱ्यांदा हस्तक्षेप केला आहे. त्याबद्दलचे कारण संयुक्तिक असले तरी संशयाचे वातावरण किंवा संशयाचे धुके निर्माण होणार आहे. मंगळवारी राज्यभरातील सर्व मतदान यंत्रे आता अति सुरक्षित व्यवस्थेमध्ये दिनांक 21 डिसेंबर पर्यंत ठेवली जाणार आहेत. त्यासाठी पोलिसांचा तिहेरी बंदोबस्त मतदान यंत्रे जिथे ठेवले आहेत तिथे असणार आहे. बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रिये वेळी राज्यात अनेक ठिकाणी वातावरण तंग झाले होते. यंदा प्रथमच मतदारांना अगदी खुलेआम बने पैशाचे वाटप करण्यात आले असा आरोप अनेक ठिकाणी केला गेला आहे. कोकणामध्ये वातावरण कमालीचे तंग बनले होते.

मालवण येथे नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असे वातावरण होते. क्रमांक नसलेल्या एका वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणली गेली आणि ती मतदारांच्या पर्यंत पोहोचवली गेली असा जाहीर आरोप निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. इथे शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झालेली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्र परिसरात गर्दी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पैशाचा मोठा प्रभाव निवडणुकीवर पडला होता. दुपारपर्यंत अनेक मतदार पैशाच्या प्रतीक्षेत घरीच असल्याचे चित्र होते.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विलक्षण चुरस होती.(results) भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांचे शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस या सर्वांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार दिले असून
ज्यांचे नगराध्यक्ष मोठ्या संख्येने निवडून येणार त्या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाजी मारली असे चित्र दिनांक 21 डिसेंबर रोजी दिसणार आहे.कारण या सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली आहे.

हेही वाचा :

गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या

कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द

‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEditEdit