कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

कोणत्याही अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असणाऱ्या व्यक्तीची विवेक बुद्धी नष्ट होते.(drug)त्यामुळे एकदा मेंदूवरचे नियंत्रण सुटले की माणसाच्या हातून काही विपरीत घडते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो. काहीजण तर क्रूरतेची परिसीमा गाठतात. कोल्हापूर शहरात हॉकी स्टेडियम रस्त्यावर घडलेल्या गुन्ह्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवाचा थरकाप उडाला आहे. माणूस इतका क्रूर होऊ शकतो? हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. मनीष राऊत याने त्याचा मित्र सिद्धेश बनवी याला इलेक्ट्रिक पोलला बांधूनत्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. या दोघांनी गांजाचे सेवन केले होते. सिद्धेश याला तर पोलला बांधल्यामुळे तो प्रतिकार शक्ती सुद्धा गमावून बसला होता. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.

अगदी सुरुवातीला या घटनेमध्ये संशयित आरोपी एकापेक्षा अधिक असावेत असा संशय व्यक्त केला जात होता.(drug) कारण एकटा मनीष राऊत हा सिद्धेश बनवी याला इलेक्ट्रिक पोलला बांधू शकत नव्हता. त्याला कुणीतरी सहाय्य केले असावे असे वाटत होते. तथापि पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मनीष राऊत यांना पकडले. तो एकटाच असल्याचे स्पष्ट झाले होते. खूनासारख्या घटनेमागेकारणही तेवढेच जबरदस्त असते. पण आता मात्र अगदी किरकोळ कारणावरून सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू लागले आहेत. सिद्धेश याला इलेक्ट्रिक बोलला बांधून ठेवून त्याला ठार मारण्यामागे कोणतेही सबळ कारण नव्हते. दोघांच्या मध्ये किरकोळ वाद झाले आणि त्याचे पर्यावसान खुनात झाले.

या दोघांनी मोठ्या प्रमाणावर गांजाचे सेवन केले होते. गांजाच्या नशेमध्ये ते दोघेही होते. आपण काय करत आहोत याचे भान या दोघांनाही नव्हते.दारूपेक्षा गांजा स्वस्त आहे. त्याचे सेवन केल्यामुळे तोंडाचा वास येत नाही. नशा मात्र प्रचंड असते. पूर्वी पाच ग्रॅम गांजा मिळवण्यासाठी मोठी खटपट करावी लागत होती. (drug)तो अगदी सहजपणे उपलब्ध होत नव्हता. गेल्या एक-दोन वर्षापासून मात्र किराणा मालाच्या दुकानात जाऊन फुटाणे विकत घ्यावेत इतक्या सहजपणे गांजा मिळतो आहे. पोलिसांनी गांजापेक्षा महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणि टपरीवर मिळणारा मावा याला अधिक महत्त्व दिले आहे. हे दोन्ही पदार्थ पोलिसांकडून जप्त केले जाऊ लागले आहेत.

त्यासाठी यंत्रणा राबवण्यात येऊ लागली आहे. (drug)पोलिसांनी हीच ताकद गांजा विक्री विरोधी वापरणे गरजेचे होते आणि आहे. सध्या तरी पोलिसांनी बंदी असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य मावा यावरच आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. गुटख्यावर आणि माव्यावर महाराष्ट्रात बंदी आणून किती तरी वर्षे होऊन गेली, पण हे दोन्ही पदार्थ पान टपरीवर अगदी सहजपणे कालपर्यंत मिळत होते. आज अनेक तरुण गांजाचा धूर काढताना अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.

ही स्वस्तातली नशा आहे आणि ती सहज उपलब्ध आहे म्हणून तरुणाई गांजाच्या प्रभावाखाली आली आहे.(drug)यापूर्वीही कोल्हापूरसह अनेक ठिकाणी खुनासारख्या घटना घडल्या आहेत आणि त्यातील संशयित आरोपी हे गांजाच्या नशेखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात संबंधिताने नशेमध्ये गुन्हा केला असे रेकॉर्ड पोलीस कधीही करत नाहीत. गुन्हा करताना संशयित आरोपीची मानसिक स्थिती उत्तम होती. आपण कोणता गुन्हा करत आहोत याचे त्याला भान होते अशा प्रकारची मांडणी पोलिसांकडून केली जात असते.

खुनासारखे जवळपास 90% गुन्हे हे अमली पदार्थाच्या अंमलाखाली गेलेल्या संशयितांकडून घडतात.(drug) म्हणूनच पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधी मोहीम उघडली पाहिजे. सध्या शेतीचा व्यवसाय संकटात आला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला बाजारात योग्य तो भाव मिळत नाही. मग आत्महत्या करण्यापेक्षा शेतात गांजाची लागवड केली म्हणून बिघडले कोठे? असा विचार काही शेतकरी करू लागले आहेत. आणि म्हणूनच कोल्हापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यात कुठेही किंवा राज्यातही गांजा अगदी सहजपणे उपलब्ध होऊ लागलेला आहे.पोलिसांकडून गांजा जप्त केला जात नाही असे नाही. गांजा विकणाऱ्यांना आणि तो पिकवणाऱ्यांना पोलिसांनी पकडले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही मात्र पोलिसांना दहा टक्के गांजा सापडतो आणि ९०% गांजा व्यसनी तरुणांच्या हातामध्ये येतो हे सुद्धा वास्तव आहे.

हेही वाचा :

गृहकर्ज घेतल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढला, बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील, जाणून घ्या

कार मॉडिफाय करण्याआधी वाचा ‘हे’ नियम; अन्यथा लायसन्स होईल रद्द

‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावाEditEditEdit