कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
उत्तर गोव्याच्या म्हापसा शहराच्या जवळ असलेल्या एका नाईट (management)क्लबला शनिवारीआणि रविवार दरम्यानच्या मध्य रात्री लागलेल्या आगीमध्ये काही पर्यटकांसह 25 पेक्षा अधिक जणांचा होरपळून मृत्यू झाला. गोव्यामधील ही सर्वात मोठी आणि भीषण दुर्घटना असल्याचे म्हटले जाते. आता हे अग्निकांड कशामुळे घडले याची दंडाधिकारीय पातळीवर चौकशी होणार असली तरी”फायर ऑडिट”हाच मुद्दा प्रथमदर्शनी पुढे आला आहे. गोव्याच्या नाईट क्लब ला लागलेली आग हा इतर हॉटेल व्यवस्थापनांनामिळालेला एक इशारा आहे.त्यांनी तो गांभीर्याने घेतला पाहिजे.गोवा हे निसर्ग रम्य राज्य जागतिक पर्यटन नकाशावर आहे. जगभरातील पर्यटकांची गोव्याला प्रथम पसंती असते. ज्यांनी गोवा पाहिला त्याने लिस्बन पाहायची गरज नाही असे पोर्तुगीज कवी कॉमाईश यांने म्हटले आहे. म्हणजे पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बन या निसर्गरम्य शहराइतकेच गोवा हे नितांत सुंदर आहे.

गोव्याचे अर्थकारण हे पर्यटनाशी निगडित आहे. परदेशात असल्याचा “फिल”गोव्यातील प्रत्येक शहरात आणि गावात फिरताना येतो.गोव्यातील कॅसिनो आणि नाईट क्लब हे पर्यटकांना मोहित करतात. (management)अलीकडच्या गेल्या काही वर्षात गोव्याचे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. उत्तर गोवा येथील” बर्च बाय रोमिओ लेन”हा नाईट क्लब प्रसिद्ध आहे. सायंकाळ झाली की पर्यटकांचे पाय इतर क्लब प्रमाणेच या नाईट क्लब कडे वळतात. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी गोव्यात पणजी, म्हापसा, मनमाड, फार्मागुडी येथे पर्यटकांची गर्दी उसळलेली असते. शनिवारी नेहमीप्रमाणेच उत्तर गोव्यातील या नाईट क्लब मध्ये पर्यटकांची गर्दी झाली होती. डान्स फ्लोअर वर शोले चित्रपटातील”मेहबूबा ओ मेहबूबा”या गाण्याच्या पार्श्वभूमीवर फायर शो सुरू असताना इलेक्ट्रिक पायरो गनमुळे आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.
वास्तविक अशा नाईट क्लब मध्ये चंगळवादाचा एक वेगळ्या प्रकारचा अविष्कार असतो. (management)जमलेले सर्वच धुंद फुंद झालेले असतात. गर्दी तर असतेच. पण आग किंवा तत्सम दुर्घटना घडली तर जमलेल्या लोकांना तेथून तातडीने बाहेर जाण्याची एक मजबूत व्यवस्था असावी लागते. जसे चित्रपट ग्रहांमध्ये दोन्ही बाजूला भरपूर रुंद असलेले मोठे दरवाजे असतात. नाईट क्लब ला आग लागल्यानंतर बाहेर सुरक्षित स्थळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांना, ग्राहकांना या अग्निकांडातून बाहेर पडता आले नाही. काहीजण होरपळून मेले तर अनेक जण गुदमरून मेले. नाईट क्लबच्या गैरव व्यवस्थापनाचे हे सर्वजण बळी आहेत.अनेक निष्पापांचे बळी गेल्यानंतर गोवा प्रशासनाने या अग्निकांडाची गांभीर्याने दखल घेऊन नाईट क्लब व्यवस्थापनाच्या विरुद्ध सदस्य मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले आहेत.
क्लबच्या चार व्यवस्थापकांना तातडीने गजाआड केले आहे. (management)आता या अग्निकांडाची प्रशासनाकडून चौकशी होईल. ही आग कशामुळे लागली? त्याला जबाबदार कोण? अशा प्रकारच्या दुर्घटना कशा टाळता येतील?याबद्दलचा एक विस्तृत अहवाल शिफारसीसह तेथील सरकारला सादर केला जाईल. पण झालेली मनुष्यहानी भरून निघणार नाही.काही वर्षांपूर्वी मुंबई येथील मंत्रालयास भीषण आग लागली होती. महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. जीवितहानी नाही पण वित्तहानी मोठी झाली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने राज्यभरातील सर्वच शासकीय इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला होता.

त्यात अनेकांचे बळी गेले होते. त्यानंतर ब्रिटिशकालीन फुलांच्या ऑडिटचा विषय पण आला (management)आणि मग स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय झाला.आपल्याकडे एखादी भीषण घटना घडून गेल्यानंतर अशी घटना घडू नये यासाठी चर्चा होते आणि काही निर्णय होतात.उत्तर गोवा येथील नाईट क्लबला आग लागल्यानंतर आता तेथील नाईट क्लबचे फायर ऑडिट करण्याचे आदेश निघतील. गोव्यातील नाईट क्लब प्रमाणेच महाराष्ट्रात पब्ज आहेत, डान्स बार आहेत, इथेही रात्री ग्राहकांची गर्दी झालेली असते. विजेचा झगमगाट असतो. एक प्रकारचा लेसर शो असतो. या झगमगाटी वातावरणात युवक आणि युवती धुंद फुंड होऊन नाचत असतात. अशा ठिकाणीहीअशाच प्रकारची दुर्घटना घडू शकते. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा अशा नाईट संस्कृतीचे फायर ऑडिट करण्याचे आदेश काढले जातील.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी