भरधाव मोटारीने टेंपो छोटा हत्ती ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटार (accident)तीनवेळा उलटली. या अपघातात मोटारीमधील २२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दिव्या कानिफनाथ भोसले सध्या रा. राजारामपुरी, कोल्हापूर. मूळ रा. नानज, सोलापूर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे, तर देविका भुते ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. हा अपघात आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूर -सांगली मार्गावर माले फाट्यावर घडला.

याबाबत अधिक माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील एका विद्यापीठामध्ये मृत दिव्या भोसले आणि जखमी विद्यार्थिनी देविका भुते या एमसीएच्या प्रथम वर्षात शिकत होत्या. (accident) त्या राजारामपुरीत राहत होत्या. आज विद्यापीठात परीक्षा असल्याने या दोन्ही विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी, असे चौघे जण भाड्याने घेतलेल्या मोटारीमधून सकाळी साडेआठच्या दरम्यान कोल्हापूरमधून बाहेर पडल्या.अतिग्रे येथील विद्यापीठामध्ये त्यांची आज परीक्षा होती. ती परीक्षा आटोपून देविका भुते हिच्या वाढदिवसासाठी ते बाहेर जाणार होते. मोटारचालक ईशान धुमाळ मोटार सुसाट वेगाने चालवत अतिग्रेकडे निघाला होता.

कोल्हापूर-सांगली मार्गावरील माले फाट्यावर याचवेळी टेंपो छोटा हत्ती स्क्रॅपच्या प्लास्टिक (accident)आणि काचेच्या बाटल्या भरून पुलाशेजारी थांबला होता. त्याचा चालक विशाल गोसावी हा ओढ्यामध्ये बाटल्या गोळा करण्यास गेला होता. याचवेळी या भरधाव मोटारीने या टेंपोला पाठीमागून जोराची धडक दिली.ही धडक इतकी जोरात होती की, मोटार हवेमध्ये उडून तीन वेळा उलटली. यामध्ये दिव्या भोसले आणि देविका भुते या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना दिव्याचा मृत्यू झाला, तर देविका भुते हिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातस्थळी रस्त्यावर काचांचा थर अक्षरशः पडला होता. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा :
चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा
महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी