कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

काही व्यक्ती अशा असतात की, त्यांचा जन्म हा समाजासाठीच झालेला असतो. (society)लौकिक किंवा दृढ अर्थाने त्यांचा जन्म हा त्या कुटुंबाशी जोडला गेला असला तरी आपल्या अफाट कर्तृत्वाने ते एखाद्या कुटुंबाशी सीमित राहत नाहीत. त्यांच संपूर्ण आयुष्य हे समाजाचा “सात बारा”उतारा होऊन जातं. डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव तथा बाबा आढाव हे असेच संपूर्ण समाजाचे झाले होते.”सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर”या प्रार्थनेतून सामाजिक अध्यात्म सांगणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने परिवर्तन चळवळीची प्रचंड हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीतील एक बिनीचा शिलेदार समाजाने गमावला आहे.

पर्यावरणवादी नेते बहुगुणा हे त्यांच्या”चिपको”आंदोलनाने आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. (society) डॉ. बाबा आढाव हे अगदी तसेच”एक गाव एक पाणवठा”या अभियानामुळे समाजाच्या, राज्याच्या आणि देशाच्या स्मरणात राहणार आहेत. अशाच परिवर्तन चळवळीतील अण्णालाल सुराणा नुकतेच गेले. आणि त्यांच्या पाठोपाठ बाबा आढाव यांनी एक्झिट घेतली. तसे त्यांना दीर्घ आयुष्य लाभले होते. वयाच्या शताब्दी कडे त्यांची वाटचाल सुरू होती. पण वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या आयुष्याचा प्रवास संपला. गेले काही दिवस ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. दिनांक एक जून 1930 रोजी पुण्यातील एका सामान्य कुटुंबात बाबांचा जन्म झाला.

शालेय, माध्यमिक, शिक्षणानंतर त्यांनी पुण्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातूनपदवी घेतली. पुण्यात त्यांनी 14 वर्षे वैद्यकीय प्रॅक्टिसही केली. पण त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मन रमत नव्हते. (society)समाजातील अनेक क्षेत्रे त्यांना खुणावत होती. मग त्यांनी चांगली चाललेली प्रॅक्टिस सोडून समाजकारणात प्रवेश केला. भाई वैद्य, बापूसाहेब काळदाते, पन्नालाल सुराणा हे त्यांचे समकालीन सहकारी होते. साथी एस एम जोशी आणि साने गुरुजी हे त्यांचे आदर्श होते. म्हणून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला. साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे दलितांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले होते त्या आंदोलनास बाबा आढाव यांनी सक्रिय हात लावला होता. अगदी वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश घेतला होता.

स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या देशातील जातीभेद अस्तित्वात होते आणि आजही काही प्रमाणात ते दिसून येतात. सत्तर वर्षांपूर्वी डॉक्टर बाबा आढाव यांनी समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत, अस्पृश्यता नष्ट व्हावीयासाठी “एक गाव एक, पाणवठा”हे अभियान त्यांनी चालू केले होते. (society)त्या काळात सवर्ण समाजासाठी स्वतंत्र पाणवठा, आणि दलितांसाठी वेगळा पाणवठा होता. गावात स्वतंत्र पाणवठे असल्यामुळे जातींच्या भिंती तयार झाल्या होत्या. एक गाव एक पाणवठा या अभियानामुळे जातीच्या भिंती कोसळतील जातीभेद गाडले जातील असा विश्वास डॉ. बाबा आढाव यांना होता. त्यांच्या या अभियानामुळे गावातील स्वतंत्र पाणवठे आता हद्दपार झालेले दिसतात. आता तर घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्वतंत्र पाणवठे आता अस्तित्वात राहिलेले नाहीत.

डॉ. बाबा आढाव यांनी हमालांना श्रमप्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून पुण्यामध्ये हमाल पंचायतीची स्थापना केली. या संस्थेची ते इतके एकरूप झालेले होते की, बाबा आढाव यांच्याशिवाय हमाल पंचायत असा विचारच कोणी करू शकणार नाही. सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीत, सत्याग्रहात भाग घेणाऱ्या डॉ.बाबा आढाव यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 53 वेळा तुरुंगवास भोगला होता. एका सत्याग्रहात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात त्यांच्या एका डोळ्याला इजा झाली आणि एक डोळा त्यांना गमवावा लागला. गोवा मुक्तिसंग्रामातही ते साथी एस एम जोशी यांच्याबरोबर त्यांनी भाग घेतला होता. परिवर्तना चळवळीचा एक भाग असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन अभियानात ते सक्रिय होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी सुरू केलेल्या या अभियानात त्यांची सक्रिय भागीदारी होती.

जाति अंताची चळवळत्यांच्या मूळ लढ्याशी सुसंगत होती. सर्वसामान्य जनतेने कर्मकांडे सोडून पुरोगामी चळवळीत उतरले पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. यासाठीच ते राजर्षी शाहू महाराजांचे अनुयायी बनले होते. राजर्षी शाहूंच्या पुरोगामी चळवळीमुळे सर्वसामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला असे डॉक्टर बाबा आढाव यांचे स्पष्ट मत होते.विविध क्षेत्रातील एकूण व्यापक योगदानाबद्दल कोल्हापुरातील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने बाबा आढाव यांना इसवी सन 1989 मध्ये शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

पुरस्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. (society)कारण हा पुरस्कार सामाजिक क्रांतीची बीजे पेरणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा होता.राज्य शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार होते मात्र त्यांनी हा सन्मान नाकारला होता. अशा प्रकारचे राज्य शासनाचे पुरस्कार स्वीकारणे म्हणजे पायात बेडी घालून घेतल्यासारखे आहे. असे त्यांचे म्हणणे होते. वास्तविक कोणत्याही पुरस्काराने डॉक्टर बाबा आढाव हे मोठे होणार नव्हते. कारण त्यांच्यामुळे पुरस्काराचेच मूल्य वाढल्यासारखे होणार होते. कोणत्याही पुरस्कारापेक्षाही फार मोठी उंची गाठलेले ते समाज पुरुष होते असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.

हेही वाचा :

शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट