नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे.(Court) मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाई, ड्रायव्हर स्टेनो लोअर आणि स्टेनो हायर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २३८१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२६ आहे.

या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.(Court) मुंबई उच्च न्यायालयात २३८१ पदांसाठी भरती होणार आहे. क्लर्क पदासाठी १३८२ जागा रिक्त आहे.शिपाई पदासाठी ८८७ जागा रिक्त आहेत. ड्रायव्हर पदासाठी ३७ जागा रिक्त आहेत. स्टेनो लोअर पदासाठी ५६ जागा रिक्त आहेत तर स्टेनो हायर पदासाठी १९ जागा रिक्त आहेत.क्लर्क आणि स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांना टायपिंगचे ज्ञान असायला हवा. शिपाई पदासाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २८ यामध्ये असावी. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला bombayhighcourt.nic.in या (Court)वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर होमपेजवरील अप्वाय लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमची सर्व माहिती भरुन अर्ज भरा.
यानंतर फी भरुन अर्ज सबमिट करा. अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

हेही वाचा :

चिकन, मासे किती काळ फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते? कधी खराब होते? इथे वाचा

महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?

वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या राशींना मेगा लॉटरी! बाबा वेंगाची छप्परफाड भविष्यवाणी