कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मध्ययुगीन काळात अनेक देशांमध्ये गुलामगिरी व्यवस्था होती. घर कामासाठी, (selling)शारीरिक सुखासाठी, स्त्रियांचा बाजार भरायचा. लिलाव पद्धतीने त्यांची विक्री व्हायची. स्त्रियांची गुलामगिरी अर्थात खरेदी विक्री उत्तर भारतातील उत्तर भारतातील आग्रा च्या जवळपास असलेल्या गावात होत असे. मध्यप्रदेशातील खंडवा गावातही महिन्यातून एकदा स्त्रियांचा बाजार भरत असे. चाळीस वर्षांपूर्वीच्या या घटना आहेत. कालच्या या घटना आज वेगळे रूप धारण करून पुढे येऊ लागल्या आहेत. गर्भाशयातच असलेल्या बाळांना विकण्याचे प्रकार उघडकीस आल्याने”माणसा! तू कधी माणूस होशील?”असा प्रश्न विचारण्याइतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.सुमारे 45 वर्षांपूर्वी अशीच माणुसकीला कलंकित करणारी घटना कोल्हापूर शहरात घडली होती. गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी लावणाऱ्या एका वंचित समाजातील एका कुटुंबांनी त्यांची राजकुमारी नामक एक सुंदर मुलगी, ती चौदा पंधरा वर्षाची असताना तिच्या पालकांनी आग्रा शहराजवळ असणाऱ्या एका गावात विकली होती.

या संदर्भातील विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक(selling) उल्हास जोशी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे तरुण फौजदार वामन कोरेकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तपासासाठी तिकडे पाठवले होते. त्यानंतर राजकुमारी नावाच्या मुलीला तिच्या जन्मदात्यांनीच विकल्याचे स्पष्ट झाले होते.या संदर्भात उत्तर भारतातील त्या गावच्या पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.एका इंग्रजी वृत्तपत्राचे गौतम सरिन नावाचे पत्रकार होते. त्यांना मध्य प्रदेशातील खांडवा (किशोर कुमार यांचे जन्मगाव) येथे स्त्रियांचा खरेदी विक्रीचा बाजार भरतो अशी माहिती मिळाली होती. वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाच्या परवानगीने गौतम हे खांडवा येथे गेले होते. तिथे त्यांनी चक्क एका स्त्रीला विकत घेतले. आणि त्या पत्रकारांनी नवी दिल्लीतील तत्कालीन विरोधी पक्षनेते मधुर दंडवते यांचे निवासस्थान गाठले.

मग तेथेच पत्रकार परिषद घेऊन दंडवते यांनी त्याची माहिती मीडियाला दिली. (selling)तेव्हा देशभर खळबळ उडाली होती. या सत्य घटनेवर”कमला”नावाचा एक चित्रपटही निघाला होता. दीप्ती नवल या अभिनेत्रीने या चित्रपटात शीर्षक भूमिका केली होती. स्त्रियांची खरेदी विक्री हा विषय उपस्थित करणाऱ्या पत्रकार गौतम सरीन यांच्याविरुद्धही तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारण त्यांनी पुरावा म्हणून एका स्त्रीला खरेदी केले होते आणि स्त्री खरेदी करणे हा गुन्हा असल्यामुळे
त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती.शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून राज्यातील बेपत्ता युवतींच्या संदर्भात माहिती देऊन विधिमंडळात या गंभीर विषयावर चर्चा व्हावी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रात केली आहे.
राज्यभरातून दररोज बेपत्ता होणाऱ्या युवतींची किशोरवयीन मुलींची संख्या वाढत आहे.

यातील काहीमुलींना, तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठीविकले जाते.(selling) हे वास्तव आहे.जेव्हा पोलिसांकडून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावरधाड टाकली जाते तेव्हा त्यातील बऱ्याचश्या तरुणी या कुणीतरी विकलेल्या असतात. प्रिव्हेन्शन ऑफइ मॉरल ट्रॅफिक ऍक्टिव्हिटीज या भारतीय न्याय संहितेखाली राज्यात आणि देशात दररोज कुठे ना कुठेतरी गुन्हे दाखल होत असतात.महाराष्ट्रात तरुणांना विवाहासाठी तरुणी मिळेनात.त्यामुळे विवाह व्यवस्था अडचणीत आली आहे. त्याचा गैरफायदा काही समाजकंटक घेताना दिसत आहेत. त्यांच्याकडूनच बनावट वधू, बनावट वऱ्हाडी,आणि बनावट लग्न हा प्रकार सुरू झाला आहे. राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे बनावट लग्नाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. गरजू तरुणाला दोन चार दिवसांसाठी ही बनावट वधू विकलेलीच असते.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग