कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

आपल्या वंशाला दिवा पाहिजे, ही मानसिकता आजची नाही. तर फार पूर्वीपासूनची आहे.(legal) सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार दोघांनीही करवून घेतल्यानंतरअपत्य प्राप्ती होणार नाही हेवास्तव पुढे येते तेव्हा मग वंशाच्या दिव्यासाठी काही पर्याय पुढे येतात, त्यामध्ये दत्तक घेणे हा वैध उपाय आहे. अवैधरित्या एखादे मूल विकत घेणे, हा आणखी एक पर्याय असतो. पण आता बाळ गर्भाशयात असतानाचते विकत घेण्याचा, आणि प्रसुतीच्या आधीच रुग्णालयात दाखल होताना केस पेपरवर विकत घेणाऱ्याचे नाव नवरा म्हणून लावण्याच्या घटना सध्या घडू लागल्या आहेत.गेल्या महिन्यात इंडोनेशियामध्ये काही रुग्णालयामध्ये गरोदर स्त्रियाप्रसूतीसाठी ऍडमिट झाल्या. केस पेपर वर त्या स्त्रियांच्या कायदेशीर पती ऐवजी दुसऱ्याच कुणाचे तरी नाव देण्यात आले होते. म्हणजे त्या स्त्रीने पती म्हणून दुसऱ्याच कुणाची तरी नाव लावले होते.

प्रसूतीनंतर हे बाळ त्या व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले. (legal)म्हणजे ते बाळ गर्भाशयात असतानाच विकण्यात आले होते आणि कुठेही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून ज्याला हे बाळ विकले त्याचेच नाव पती म्हणून केस पेपरवर असल्यामुळे हा व्यवहार तांत्रिकदृष्ट्या रीतसर झाला होता. पण पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले.ज्याच्याकडे हे बाळ होते त्याची आणि त्या बाळाची डीएनए टेस्ट घेण्यात आली त्यामध्ये हा गर्भाशयातील भ्रष्टाचार घोडके आला.अगदी अशाच पद्धतीने गेल्याच महिन्यात महाराष्ट्रातील नवजात अर्भकांची विक्री करण्यात आली होती. डीएनए टेस्टमध्ये वास्तव समोर आले तेव्हा पोलीसही थक्क झाले होते.अशाप्रकारे विकत घेतलेल्या मुला मुलींची एखादा दुसरा अपवाद वगळला तर मानवी तस्करीच केली जाते. विकत घेतलेल्या मुलांना भीक मागण्यासाठीही वापरले जाते.

गरिबी, निरक्षरता, व्यसनाधीनता, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, (legal)आणि जन्मलेल्या मुलीचे ओझे अशा काही कारणामुळे मूल विकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आपणाकडून मूल विकले जाणे हा गंभीर गुन्हा आहे याची जाणीव संबंधितांना नसते. मुला मुलींची विक्री होणे ही काही केवळ भारतातील समस्या नाही तर ती जागतिक समस्या आहे. संयुक्त राष्ट्र संघाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.सुमारे 20/ 25 वर्षांपूर्वी मुंबईतील सर्वाधिक खपाच्याएका वृत्तपत्रात आतील पानावर एक जाहिरात आली होती.”उसनी माता पाहिजे”अर्थात गर्भाशय उसने पाहिजे अशा अर्थाची ती जाहिरात होती. त्याला इंग्रजी मध्ये” सरोगेट मदर”म्हणतात.

वंशाला दिवा पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या मार्गाचा अवलंब अलीकडे केला जाऊ लागला आहे. (legal)त्याला कायदेशीर मान्यताही आहे. असे प्रकार उच्चभ्रू समाजात केले जातात. यामध्ये उसनी माता बनवणाऱ्या स्त्रीला काही लाखात पैसे दिले जातात. याशिवाय प्रसुतीच्या आधी तिच्याबरोबर लिखित करारही केला जातो.मात्र मुला मुलींची विक्री अन्य कारणासाठी ही केली जाते. रुग्णालयातून नवजात अर्भकांची चोरी होण्याचे प्रकार अधून मधून घडत असतात. हे सर्व टाळण्यासाठी कठोर कायदे अपेक्षित आहेत. बाल संरक्षण यंत्रणा मजबूत करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग