कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मतदार याद्यांच्या संदर्भात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे समाधान करण्यात आले आहे.(candidates) त्यांच्या सर्व शंका आणि कुशंका यांचे निरसन करण्यात आले आहे असा दावा करत राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी राज्यातील सर्वमहापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. प्रचाराची हलगी वाजवण्यासाठी केवळ बारा दिवस मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर “रात्र थोडी सोंगे फार”असे चित्र असणार आहे. या निवडणुकीसाठीची आचारसंहिताही सोमवारपासून लागू करण्यात आली आहे.सदोष मतदार याद्या दुरुस्त करण्यात आल्यानंतरच राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या पाहिजेत. असे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विरोधी पक्षांच्या वतीने मतदार यादीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त यांना मतदारसंघाच्या संदर्भात जे प्रश्न विचारले होते त्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयुक्तांनी दिलेले नाही असे स्पष्ट केल्यामुळे निवडणूक आयुक्त आणि विरोधी पक्षनेते या दोघांपैकी खरे कोण बोलते आहे असा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे.

बृहन मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या (candidates) निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी आधी दोन दिवस मी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी प्रत्यक्ष संवाद आणि संपर्क साधून, त्यांना विश्वासात घेऊन मतदार याद्यांच्या बद्दल त्यांचे समाधान केलेले आहे आणि त्यांनीही आता आमचा कोणताही प्रश्न शिल्लक नाहीअसे स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या मतदार यादी मध्ये 11 लाख मतदारांची दुबार नोंद झालेली आहे आणि अशा मतदारांच्या समोर आम्ही स्टार हे चिन्ह टाकलेले आहे. त्यांना एकाच ठिकाणी कुठेतरी मतदान करावे लागणार आहे. आयुक्तांच्या निवासस्थानावर 150 मतदार नोंदले गेलेले आहेत त्याबद्दलही आम्ही केलेला खुलासा राजकीय नेत्यांनी मान्य केलेला आहे.

एका टॉयलेट मध्ये पंधरा मतदारांची नावे असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता (candidates) तथापि या टॉयलेटच्या वरच्या दोन मजल्यावर हे मतदार राहतात हे आमच्या तपासणीचा सिद्ध झाले असल्याचा खुलासा विरोधी पक्षांनी मान्य केला आहे असे दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे. विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरे आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे या दोघांच्या वक्तव्यात तफावत आहे. वाघमारे म्हणतात की आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांचे समाधान केले आहे आणि इकडे विरोधी पक्ष नेते सदस्य मतदार याद्या या मुद्द्यावर ठाम आहेत त्यामुळे नेमके खरे कोण बोलते आहे आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दिनांक 23 डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. दिनांक 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान आणि दिनांक 16 जानेवारी रोजी मतमोजणी असा हा एकूण कार्यक्रम आहे. सोमवारपासून बरोबर एक महिन्यांनी मतदान होणार आहे. (candidates) याचा अर्थ उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचार करण्यासाठी अवघे बारा दिवसच मिळणार आहेत.काही ठिकाणी तीन सदस्य आणि काही ठिकाणी चार सदस्य यांचा एक प्रभाग असणार आहे. म्हणजे मतदारांना तीन ते पाच मते द्यावी लागणार आहे. मतदार संघाचा आवाका मोठा असल्यामुळे अवघ्या बारा दिवसात शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवाराला पोहोचणे सहज शक्य होणार नाही.

दिनांक एक जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केलेली मतदार यादी ही अंतिम असणार आहे.(candidates) मतदार यादी मधील नाव वगळणे किंवा नाव समाविष्ट करणे हे अधिकार राज्य निवडणूक आयुक्तांना नाहीत दिनांक एक जुलै 2025 ची मतदार यादी ही निर्दोष आहे असे गृहीत धरून राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी निवडणुकांची घोषणा केलेली आहे. त्यामुळे निवडणुकीलाच विरोध करणाऱ्या राज्यातील विरोधी पक्षांना जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम मान्य करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.आता मंगळवारपासूनच महाविकास आघाडी, महायुती, वंचित आघाडी यांना हालचाली गतिमान कराव्या लागणार आहेत. जागा वाटपाचे सूत्र ठरवावे लागणार आहे,

उमेदवारांच्या नावांची घोषणा करावी लागणार आहे.(candidates) भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी बहुतांशी ठिकाणी महायुती एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे असे सांगितल्यामुळे काही ठिकाणी महायुती मधील घटक पक्षांची कुंडली जुळणार नाही असा त्याचा अर्थ होतो. 29 महापालिकांमधील 2869 जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. त्यामध्ये ओबीसी संख्या 759 अनुसूचित जमाती 341 आणि अनुसूचित जाती 77 आणि 1442 खुला गट अशी संख्या आहे.तीन कोटी 46 लाखांपेक्षा अधिक राज्यामध्ये महानगरक्षेत्रातील मतदार आहेत. 290 निवडणूक निरीक्षक 870 सहाय्यक आणि एक लाख 96 हजार 605 कर्मचारी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियुक्त केले जाणार आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये 11 लाख मतदार हे दुबार असल्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनीच कबूल केल्यामुळे तिथली मतदार यादी सदोष आहे हे सिद्ध झालेले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग