कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण होतं.(Strong)आता ते 50 टक्क्यावर पोहोचलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 29 महानगरामध्ये“आम्ही बाई जोरात”असे चित्र दिसणार आहे. तर कोल्हापूर महानगरात”कारभारी जोरात” असणार आहेत. कारण महिला सदस्यांच्या नवऱ्यांची प्रशासनात लुडबुड चालायची. नगरसेविका नामधारी आणि नवरेच त्यांचे महापालिकेत कारभारी हे चित्र पूर्वी होते आणि आता ते अधिक गडद असणार आहे. छत्रपती रणरागिनी ताराराणी हे कोल्हापूर महापालिकेचे बोध चिन्ह आहे. कारण हे शहर रणरागिनी ताराराणींचे राजधानीचे शहर होते. आणि याच महापालिकेत महिला सदस्यांना काम करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. सभागृहाबाहेर त्यांचे पतीच कारभारी असतात.

कोल्हापूर महापालिकेच्या 2015 च्या सभागृहात 81 सदस्या पैकी 33% महिला होत्या. (Strong)आताही जानेवारी 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत विष प्रभागात 81 सदस्य असणार आहेत आणि 50% आरक्षणामुळे महिलांची संख्या 41 वर गेली आहे म्हणजे टक्का वाढलाच आहे. याचा अर्थ 2026 च्या निवडणुकीनंतर 41 कारभारी असणार आहेत. या कारभाऱ्यांची प्रशासनात लुडबुड वाढणार आहे. यापूर्वी हे कारभारी स्वतःच नगरसेवक असल्यासारखे आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना भेटायचे. नगरसेविका पत्नीच्या वतीनेतेच भूमिका मांडायचे. महापालिका अंतर्गत नगरसेवकांच्या पक्षीय बैठकीतही कारभारी नगरसेवकच म्हणूनही मांडायचे किंवा चर्चेत भाग घ्यायचे. कोल्हापूरचे हे कारभारी नगरसेवक राज्यभर चर्चेत होते आणि आताही असणार आहेत. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारभाऱ्यांची जाणवण्या इतकी लुडबुड नसते.
यंदा चार सदस्यांचा एक प्रभाग आहे. म्हणजे पॅनेल सिस्टीम अस्तित्वात आणली गेली आहे.(Strong) ही सिस्टीम पहिल्यांदाच आली असल्यामुळे एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार प्राप्त झाला असून हे मतदान नेमके कसे करायचे असा बहुतांशी मतदारांच्या मनामध्ये गोंधळ आहे. महाविकास आघाडी, महायुती यांच्याबरोबरच बहुजन वंचित आघाडी सुद्धा या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात तीन पॅनल असतील. प्रत्येक प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव असतील. तीन पॅनेल्स गृहीत धरली तर एका प्रभागात सहा महिला निवडणूक रिंगणात असणार आहेत. वीस प्रभागात मिळून त्यांची संख्या 120 असू शकते.
आणि इच्छुक महिला उमेदवारांची संख्या त्यापेक्षाही अधिक आहे. (Strong)मला उमेदवारी देणार नसाल तर माझ्या पत्नीला उमेदवारी द्या असे इच्छुकांनी त्यांच्या नेत्यांसमोर पर्याय ठेवलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुती च्या घटकपक्षिय नेत्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. सध्या स्थानिक नेत्यांकडून इच्छुकांच्या मुलाखती चे सत्र सुरू आहे.चार सदस्यांचा एक प्रभाग असल्यामुळे मतदार संघ फारच विस्तारित असा आहे. प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या 25 हजाराच्या आसपास आहे.
परिणामी उमेदवारांच्या खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे धन दांडग्या उमेदवारांनाच निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महिलांना उमेदवारी देताना त्यांची आर्थिक स्थिती, त्यांचा असलेला जनसंपर्क, (Strong)सामाजिक कामातील त्यांची भागीदारी, वैचारिक बैठक त्यांच्या घराण्याची राजकिय पार्श्वभूमी याचा विचार करूनच महिलांना उमेदवारी दिली जाणार आहे. विसर्जित सभागृहात काम केलेल्या काही माजी नगरसेवकांनी आपली पत्नी, वहिनी किंवा बहिण यांना निवडणूक रिंगणात आणण्याचे ठरवले आहे.कोल्हापूर शहरात किंवा प्रभाग परिसरात नाव असलेल्या सामाजिक क्षेत्रातील महिला कार्यकर्त्यांची कमी नाही,
त्यांच्या पैकी फार कमी महिला कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे.काही महिला अशा आहेत की त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्या अनेक कारणाने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभांना, मोर्चे, निदर्शने आदि आंदोलनात त्या दिसतात. पण आर्थिक पाठबळ नसल्याने, त्यांना आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या महिला उमेदवारांच्या पाठीमागे “आगे बढो “ची भूमिका घ्यावी लागते आहे.
हेही वाचा :
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ आयडी कार्ड असणं बंधनकारक
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर
JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात