कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (heating)राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजवल्यानंतर आता राज्य पातळीवर वातावरण तापू लागला आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे राजकीय पक्षांतर्गत इनकमिंग अजूनही सुरूच आहे. मुंबईत महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली आहे. आणि ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आरोप आणि प्रत्यारोपांच्या ठिणग्या पडू लागल्याने राजकारण चांगलं तापलं आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जाऊ लागल आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी उद्धव ठाकरे यांनी लूटली अशी टीका होऊ लागल्यामुळे त्याला तितक्याच ताकतीने ठाकरे यांच्याकडून उत्तर दिले जात आहे.

गेल्या सहा महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे (heating)बंधू एकत्र येऊन युती करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन वेळा हे बंधू एकत्रही आले होते. मात्र युतीची घोषणा झालेली नव्हती आणि अजूनही ती झालेली नाही. मात्र हे दोन्हीठाकरे बंधू बृहन्मुंबई महापालिकेसह पाच महापालिकांच्या निवडणुका एकत्रित लढणार आहेत.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत असल्यामुळे महा विकास आघाडीमध्ये फूट पडणार हे अपेक्षित होते. राज ठाकरे यांची परप्रांती यांच्या संदर्भातील भूमिका काँग्रेसला मान्य होऊ शकत नव्हती. आणि म्हणूनच काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे.

महाविकास आघाडी मधून काँग्रेसने बाहेर पडणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या भाजपला (heating)मदत केल्यासारखे होणार आहे अशी टीका संजय राऊत यांनी काँग्रेसवर केली आहे मात्र काँग्रेसने स्वबळाच्या भूमिकेवर ठाम भूमिका घेतली आहे. याचा अर्थ मुंबईत महाविकास आघाडी फुटली आहे आता मुंबईत ठाकरे बंधू राष्ट्रीय काँग्रेस विरुद्ध महायुती भाजप शिवसेना अशी लढत होणार आहे. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामध्ये सर्वात लक्ष वेधले जाणार आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाकडे.

मुंबई आणि आसपासच्या पाच महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल काय लागतो(heating) यावर महाराष्ट्राचे राजकारण रंगणार आहे, बदलणार आहे. आपली “राजकीय पत “अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत जीवाचे रानकरावे लागणार आहे. कारण त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीमध्ये अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण तरीही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पुण्यामध्ये एकत्र येणार काय हे एक-दोन दिवसातच स्पष्ट होईल. एकूणच महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेच्या बनवलेल्या आहेत. बहुतांशी महानगरांवर त्यांना भाजपचा झेंडा फडकवायचा आहे.

महापौर भाजपचा करावयाचा आहे. विशेषतः मुंबई महापालिकेत (heating)भाजपला आपला महापौर बनवायचा आहे. आणि त्यासाठीच त्यांनी रणनीती आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना दबावाखाली ठेवले आहे असे चित्र आहे. म्हणूनच या निवडणुकीत महायुतीमध्येच परस्पर विरोधी वातावरण तयार झाले आहे आणि होते.विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना 50 टक्के जागा हव्या होत्या पण त्या त्यांना मिळणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट झाल्यामुळे महायुतीमध्ये काहीसे तणावाचे वातावरण राहणार आहे.मुंबई महापालिकेसह आसपासच्या पाचही महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे यांना समान जागा हव्या आहेत. त्यासाठी त्यांनी मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्याशी अबोलाही धरला होता.भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही महापालिकांच्या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी महायुती एकत्रित लढेल असे नाही असे म्हटले आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना, भाजप विरुद्ध अजितदादा पवार गट अशी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा :

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ आयडी कार्ड असणं बंधनकारक

ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर

 JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात