कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयातपाच ठिकाणी बॉम्ब पेरले आहेत अशा (vigilance)आशयाचा एक ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर घबराटीचे वातावरण तयार झालेच शिवाय भयंकर खळबळ सुद्धा उडाली. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली संपूर्ण परिसरपिंजून काढल्यानंतर कुठेही बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. अशा प्रकारचा ई-मेल पहिल्यांदाच मिळाला आहे. यापूर्वी असे कधी घडलेले नव्हते आणि म्हणूनच सावधानता बाळगायला हवी, खबरदारी घ्यायला हवी, कारण दहशतवादी कारवायांसाठी कोल्हापूर हे सॉफ्ट टार्गेट आहे.कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात दररोज किमान 50 हजार धार्मिक पर्यटक दर्शनासाठी येत असतात. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर हे मंदिर आहे. आणि म्हणूनच दरवर्षी केंद्र शासनाच्या गृह खात्याची एक टीम मंदिराला भेट देत असते.

मंदिराच्या सुरक्षिततेविषयीची पाहणी करत असते, माहिती घेत असते, (vigilance)आणखी काय सुरक्षितता बाळगता येईल याचे मार्गदर्शन करत असते.या टीमच्या सूचनेनुसारच मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला असतो आणि आहे. पोलिसांचा हा बंदोबस्त कधी ढिसाळ असतो तर कधी प्रभावी असतो.भाविकांना धातूशोधक यंत्राच्या चौकटीतूनच प्रवेश दिला जातो याशिवाय भाविकांच्याकडे असलेल्या बॅगा किंवा पर्स यांची खास यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी केली जाते. पण या तपासणीत सातत्य असतेच असे नाही. अनेकदा यंत्रणा नादुरुस्त झालेली दिसते. भाविकांच्या बॅगा आणि पर्स तपासणीचे यंत्र अधून मधून बंद पडते.मंदिराच्या चौफेर परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. लॉजिंग आहेत. यात्री निवास आहेत.
पोलिसांकडून दिवसातून किमान एकदात्यांची तपासणी करणे आवश्यक असते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला अशाच प्रकारची तपासणी अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडत नाही. (vigilance)एकूणच सुरक्षिततेच्या दृष्टीने”राम भरोसे”वातावरण आहे.काही वर्षांपूर्वी कोल्हापुरातील एक युवक काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांबरोबर झालेल्याचकमकीत ठार झाला होता.
त्याच्याही आधी करवीर तालुक्यातील एका गावात त पाकिस्तानी आय एस आय चा एजंट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सापडला होता. त्याला न्यायालयाने शिक्षाही ठोठावली होती.शिक्षा भोगून झाल्यानंतर तो पाकिस्तानला गेला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलामध्ये दहशतवाद्यांकडूनप्रशिक्षण शिबिर घेतले गेल्याचे नंतर काही दिवसांनी उघडकीस आले होते.
कोल्हापुरात दहशतवादाविरोधी तपास करणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. पोलीस प्रशासनात त्यासाठीचा स्वतंत्र सेल नाही. यापूर्वी एक दोन वेळा अंबाबाई मंदिर परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली होती.
एखादा खरोखरच बॉम्ब आढळला तर तो निकामी करण्यासाठी पुण्यातून तज्ञ(vigilance) पाचारण करावा लागतो.माधवराव सानप हे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी आरडीएक्स नेमके कसे असते आणि ते कसे ओळखायचे यासाठी एक प्रात्यक्षिक घेतले होते.आता तेव्हाचे पोलीस कर्मचारी सेवानिवृत्तही झालेली असतील. त्यामुळे आत्ताच्या पोलिसांना आरडीएक्स कसे असते हे माहीत नाही. त्यांना त्या दृष्टीने आता प्रगत आणि प्रशिक्षित केले पाहिजे.सुदैवाने कोल्हापुरात दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल्स नाहीत. त्यामुळे दहशतवाद्यांना इथे काही करता येईल असे नाही. पण म्हणून बेसावध राहणे महागात पडू शकते. शुक्रवारी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चेन्नई येथून एका माजी आमदाराची नात असलेल्या छोट्या मुलीच्या नावाने सावधगिरी बाळगण्याचा ई-मेल आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात काही ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत आरडीएक्स ठेवले आहे (vigilance)अशी त्यामध्ये माहिती होती. त्याची गांभीर्याने दखल घेऊन तपास यंत्रणांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. आक्षेपार्ह काही आढळून आले नाही. अशा प्रकारचे ई-मेल किंवा अज्ञात व्यक्तीचे फोन यापूर्वी कधीही आलेले नाहीत. पण पहिल्यांदाच कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचा ई-मेल आला आहे तो पोकळ धमकीचा होता हे स्पष्ट झाले असले तरी सावधानता बाळगली पाहिजेखबरदारी घेतली पाहिजे.कारण दहशतवाद्यांसाठी कोल्हापूर हे सॉफ्ट टार्गेट असू शकते.
हेही वाचा :
आज 12 तारीख आणि डिसेंबर महिना, ‘हा’ दिवस भाग्यवान का मानला जातो? जाणून घ्या
LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा
“महिलांनी झोपण्यापूर्वी टाळावीत ही ५ धोकादायक सवयी; आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम”