कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
कोकणच्या जनतेने रेल्वेचे पाहिलेले स्वप्न शंभर वर्षानंतर विसाव्या शतकाच्यानवव्या दशकात पूर्ण झाले.(project) कोकण रेल्वे हा अभियांत्रिकी आणि स्थापत्य शास्त्रातीलअविष्कार आणि चमत्कार समजला जातो. आता हे पुन्हा घडणार आहे आणि तेही कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे प्रकल्पामुळे. हा प्रकल्प आता गतीने पूर्ण करण्याचा निर्धार राज्य शासनाने केलेला आहे आणि म्हणूनच या मार्गावरील सुमारे684 हेक्टर जमीन संपादन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडण्यासाठी कोल्हापूर ते राजापूर आणि कोल्हापूर ते वैभववाडी हे दोन पर्याय होते. त्यापैकी कोल्हापूर ते वैभववाडी हा 108 किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प तत्त्वतः मंजूर करण्यात आला होता. केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहयोगातून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना कोल्हापूर हे कोकणला जोडण्याचा विचार गांभीर्याने सुरू झाला.

प्राथमिक पातळीवर थोडेफार सर्वेक्षणाचे कामही झाले. पुढे काही घडले नाही.(project) मात्र 2021 मध्ये कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाची चर्चा पुन्हा सुरू झाली. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावही तयार करण्यात आला. या प्रकल्पात राज्याचा हिस्साही ठरवण्यात आला. आता हा प्रकल्प गतिमान होण्याची शक्यता वाढली आहे. कारण भूसंपादनाचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला तर देशातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी जोडली जाणार आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रही जोडला जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक सुलभ होणार आहे. उद्योग आणि व्यापारास चालना मिळणार आहे. रस्त्यावरील वाहतुकीला पर्यायी उपलब्ध होणार आहे. महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक उत्पादने तसेच कृषीमाल कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाने देशाच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे.
मालवाहतुकीच्या खर्चातही त्यामुळे घट होणार आहे.कोल्हापूर हे कोकणच्या मालाची उतारपेठ म्हणून आजही ओळखले जाते. कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडले गेल्यामुळे त्यात बदल होणार आहे. (project)या रेल्वे मार्गामुळे घाटावरचा माल घाटाखाली म्हणजे कोकणातकमी खर्चात पोहोचणार आहे.जेव्हा या रेल्वेमार्गाची घोषणा करण्यात आली तेव्हा तो इसवी सन 2026 पर्यंत पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र घोषणा केलेल्या या रेल्वे मार्गाचाशुभारंभ झाला नाही. किंबहुना तो अडगळीत टाकण्यात आला की काय असे वातावरण तयार झाले होते. दुर्दैवाने कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनीही या संदर्भात एकत्र येऊन प्रयत्न केलेले आहेत असे चित्र दिसले नाही. केंद्र शासनाशी निगडित असलेल्या काही मागण्या पूर्ण करून घेण्याच्या हेतूने मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील खासदारांची अधून मधून किंवा वर्षातकेव्हातरी बैठक बोलावतात.
अशा बैठका यापूर्वीही झालेल्या आहेत. या बैठकीत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे (project)प्रस्तावावर चर्चा झालेली नाही. कोल्हापूरच्या खासदारांची ती जबाबदारी होती. या खासदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे आग्रह केला आहे असे दिसले नाही.आता दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घातले आहे.गुरुवारी झालेल्या एका बैठकीत त्यांनी या रेल्वे मार्गावरील भूसंपादनाचे काम तातडीने हातात घ्या असे आदेशच संबंधित यंत्रणेला दिले आहे. यासाठीचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केल्यामुळे या रेल्वे मार्ग विषयी कोल्हापूरकरांच्या आशा पुन्हा पल्लवीत झालेल्या आहेत.कोकण रेल्वे हे जसे कोकणच्या जनतेने स्वप्न पाहिले होते तसेच कोल्हापूरच्या जनतेने कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडण्यासंदर्भातील स्वप्न पाहिले आहे. आता हे स्वप्न वास्तवात येण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. आणि आणखी काही वर्षात हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. कोल्हापूर ते वैभववाडी या मार्गावर रेल्वे धावेल.

कोल्हापूर वैभववाडी हा रेल्वे मार्ग सुद्धा तसा अगदी सहज आणि सोपा नाही. (project)कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणताना जे अभियांत्रिकी कौशल्य वापरले गेले तेच या मार्गासाठी ही वापरावे लागणार आहे.कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गावर एकूण दहा स्थानके असणार आहेत. 55 उड्डाणपूल, छोटे 74 पूल आणि मोठे 25 फुल तसेच काही बोगदेही या मार्गावर असणार आहेत.
राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसातच कोल्हापूर ते मिरज रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. आणि केवळ तीन वर्षात हा महत्त्वकांक्षी रेल्वे मार्ग बांधून पूर्ण केला होता. संस्थान काळात अनेक अडचणी असताना सुद्धा कोल्हापूर ते मिरज हा रेल्वे मार्ग पूर्ण होतो तर मग आत्ता सर्व प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे
कोल्हापूर वैभववाडी हा रेल्वे मार्ग सुद्धा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा निश्चय राज्य शासनाने व केंद्र शासनाने केला तर ते राजर्षी शाहू महाराजांना एक वेगळ्या प्रकारचे अभिवादन ठरू शकेल.
हेही वाचा :
आज 12 तारीख आणि डिसेंबर महिना, ‘हा’ दिवस भाग्यवान का मानला जातो? जाणून घ्या
LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा
“महिलांनी झोपण्यापूर्वी टाळावीत ही ५ धोकादायक सवयी; आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम”