मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इचलकरंजी येथे शंभूतीर्थाचे लोकार्पण करण्यात आले.(inspiration) या कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करत, हा केवळ पुतळ्याचा कार्यक्रम नसून स्वाभिमान आणि इतिहासाच्या स्मरणाचा सोहळा असल्याचे सांगितले. हिंदू धर्म आणि भगवा ध्वज जपण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी इतिहासाची खरी ओळख तरुण पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, असा आग्रह धरला.फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात मुघल साम्राज्याला मोठे स्थान देण्यात आले होते, तर आपल्या राजांच्या पराक्रमाला केवळ मर्यादित उल्लेख होता. मात्र आता ही स्थिती बदलली असून, मुघल इतिहास संक्षिप्त झाला आहे आणि शिवरायांच्या कार्याला सविस्तर स्थान देण्यात आले आहे. यामुळे स्वराज्याचा खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की,(inspiration) औरंगजेबाला नऊ वर्षे झुंजवत ठेवण्याचे सामर्थ्य संभाजी महाराजांकडे होते. त्यांनी १२० युद्धे लढली आणि एकही लढाई हरली नाही. दगाफटका झाला नसता, तर त्यांना पराभूत करण्याची ताकद कुणातच नव्हती. युद्धनिती, रणनिती, विद्वत्ता आणि भाषांवरील प्रभुत्व यामुळे संभाजी महाराज खऱ्या अर्थाने सूर्यासारखी तेजस्वी प्रतिभा असलेले राजे होते, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.संभाजी महाराज शहीद झाले नसते, तर आजचा इतिहास वेगळा असता, असे सांगत फडणवीस यांनी मराठ्यांनी मुघल साम्राज्याचा नायनाट करून हिंदवी स्वराज्य अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवले, हेही नमूद केले. शिवरायांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत पुढील पिढ्यांनी तेवत ठेवली, असे ते म्हणाले.

हे पुतळे केवळ दगडाचे नाहीत, तर इतिहासाची आठवण करून देणारे (inspiration) आणि स्वाभिमान जागवणारे प्रतीक आहेत, असे सांगत त्यांनी समाजाला एकत्र राहण्याचे आवाहन केले. जातीपातीच्या भिंती तोडून एकजुटीने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भिडे गुरुजींचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भिडे गुरुजींसारखे गुरूजी छत्रपतींचा इतिहास तरुणांच्या मनात रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून स्वाभिमानी, इतिहासाची जाण असलेली पिढी घडत असून, आज उभे राहिलेले हे स्मरणस्थळ त्याचेच प्रतीक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आयोजकांचे आणि नागरिकांचे अभिनंदन केले.
हेही वाचा :
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग