नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे.(battle)त्यामुळे महापालिकेवर सत्ता मिळण्यासाठी आणि आपल्या पक्षाचा पहिला महापौर करण्यासाठी मोठी राजकीय चुरस पाहावयास मिळणार आहे.यामध्ये सध्या मजबूत स्थितीत दिसत असलेल्या महायुतीला टक्कर देताना महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. नगरपालिका असताना पहिली सहा महिने आणि महापालिका झाल्यानंतर साडेतीन वर्षे, अशी एकूण चार वर्षे प्रशासक राजवट आहे. त्यामुळे महापालिकेच्या पहिल्या सभागृहाचा सदस्य होण्याची मोठी आस सर्वच पक्षांतील इच्छुकांना लागली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम कधी लागणार, (battle)याची प्रतीक्षा सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांना होती. शहरवासीयांनाही याबाबतची आतुरता होती. आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचे समजताच इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. अनेकांनी प्रभागात प्रचारालाही सुरुवात करीत वैयक्तिक भेटीगाठींसह सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे, तर काही जणांनी पक्षीय उमेदवारीची वाट पाहणे पसंत केले आहे.

महापालिका झाल्यानंतर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आहे.(battle) त्यामुळे पहिल्या सभागृहाचा सदस्य होण्याचा मान मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे अपक्षांची डाळ शिजणार नाही. त्यामुळे पक्षीय उमेदवारी मिळविताना अनेकांना नाकीनऊ येत आहे.महायुती होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी जागा वाटपाबाबत अद्याप भाजपने घटक पक्षांना अपेक्षित दाद दिलेली नाही. जागा वाटपात तोडगा न निघाल्यास भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या घटक पक्षांच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे; पण अंतिम टप्प्यात महायुती होईल, असे संकेत मिळत आहेत.

महाविकास आघाडीकडून महापालिकेसाठी एक चिन्हाचा पॅटर्न वापरला जाणार आहे. (battle)सर्वच घटक पक्षाचे वेगवेगळे चिन्ह घेण्याऐवजी सर्वांनी एकच चिन्ह घेण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानुसार एकत्रित इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज भरून घेण्यात आले आहेत. त्यांच्या आता मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आघाडी महायुतीला कशी टक्कर देणार याबाबत अधिक उत्सुकता आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग