व्हॉट्सॲप युजर्सची टेंशन वाढवणारी बातमी आहे. जगभरातील तीन अब्जाहून (billion)अधिक व्हॉट्सॲप युजर्सची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. एका सुरक्षा तज्ज्ञाने एक असा टूल तयार केला आहे ज्याद्वारे फोन नंबरवरून कोणत्याही ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवली जाऊ शकते. हे टूल गुप्तपणे काम करते, व्हॉट्सॲप युजर्सला ते माहिती देखील पडत नाही. या पद्धतीला सायलेंट व्हिस्पर असे नाव देण्यात आले आहे. ते व्हॉट्सॲप आणि सिग्नल ॲपमधील एका कमकुवतपणाचा फायदा घेते.हल्लेखोर कोणताही मेसेज न पाठवताही तुमच्या मोबाईलमधून माहिती काढू शकतो. हे एक गुप्त हेरगिरी करणारे सिक्रेट टूल आहे जे तुमच्या गोपनीयतेसाठी धोका निर्माण करू शकतो. हे टूल कसे कार्य करते आणि तुम्ही अशा सायबर हल्ल्याला कसे ओळखू शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत…

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर?(billion) VIDEO सायबर न्यूजच्या अहवालानुसार, जेव्हा व्हॉट्सॲप किंवा सिग्नलवर मेसेज येतो तेव्हा अॅप आपोआप मेसेज मिळाल्याचे कन्फर्मेशन पाठवतो. हे कन्फर्मेशन खूपच फास्ट होते आणि युजर्सला दिसत नाही. हल्लेखोर हे कन्फर्मेशन येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ मोजतो. या वेळेच्या आधारे तो फोन चालू आहे की बंद आहे, युजर्स फोन वापरत आहे की नाही आणि तो घरी आहेत की बाहेर आहे. जर फोन वाय-फायवर असेल तर प्रतिसाद लवकर येतो. मोबाईल डेटावर ही प्रोसेस स्लो होते.

बराच वेळ नजर ठेवल्यामुळे युजर्सच्या दैनंदिन सवयी, झोपेचा (billion)आणि उठण्याचा वेळ आणि प्रवासाचे वेळापत्रक हल्लेखोराला माहिती मिळते. हे सर्व कोणताही मेसेज वाचल्याशिवाय आणि कॉन्टॅक्ट लिस्ट पाहिल्याशिवाय होऊ शकते. या हल्ल्यामुळे फोनची बॅटरी झपाट्याने संपते. सामान्य परिस्थितीत निष्क्रिय फोन प्रति तास १ टक्क्यापेक्षा कमी बॅटरी वापरतो. पण या हल्ल्यादरम्यान आयफोन १३ प्रोची बॅटरी १४ टक्के, आयफोन ११ ते १८ टक्के आणि सॅमसंग गॅलेक्सी एस२३ १५ टक्के प्रति तासाने कमी होते.सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो ज्यामुळे व्हिडिओ कॉलसारखी कामे करणे कठीण होते. युजर्सला त्यांचे मोबाइल जास्त गरम होत असल्याचे किंवा बॅटरी लवकर संपत असल्याचे लक्षात येऊ शकते. पण ते त्याचे कारण शोधू शकत नाहीत. या टूलच्या निर्मात्याने असे सांगितले आहे की, हे टूल फक्त संशोधनासाठी आहे. त्याचा गैरवापर करू नये. कोणीही ते डाउनलोड आणि वापरू शकते.
हेही वाचा :
इचलकरंजी :महाविकास आघाडीला धक्का: सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याचा राहुल आवाडेंसोबत हातमिळवणी
इचलकरंजी : निवडणुका बदलल्या, चेहरे बदलले; पण समस्या तशाच — आश्वासनांच्या जाळ्यात अडकलेली वस्त्रनगरी
बाबा वेंगा : नाही टळणार ही भविष्यवाणी; आता सर्व बदलणार, एक दिवस सर्व जग हिंदू धर्म स्वीकारणार