क्रूरतेचाही गाठला अंत…! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले video viral

सुरवातीपासूनच माणूस आपल्या शक्तीचा आणि बुद्धीचा फायदा घेत प्राणी (python)पक्ष्यांचा छळ, त्यांच्यावर अन्याय करत आला आहे. प्राणी असले तरी त्यांच्यातही भावना आहेत, जीव आहे हे माणसांना काळत नाही आणि यातून जन्म होता मानवाच्या क्रूर स्वभावाचा! याआधी मानवाने प्राण्यांसोबत गैरवर्तन केल्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत आणि अशातच आता आणखीन एक व्हिडिओ यात सामील झाला आहे ज्यात एक व्यक्त अजगराला आपल्या बाईकच्या बॉनेटवर लटकवत त्याला आपल्या चालू रस्त्यावर फरफटत कुठेतरी घेऊन जाताना दिसून येत आहे. व्हिडिओतील हे दृश्य युजर्सना अजिबात आवडले असून लोक आता यावर आपला तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

अजगर हा कितीही धोकादायक असला तरी व्यक्तीने वनविभागाला बोलवून त्याला उचलायला सुरक्षित जागी पोहचवायला सांगायला हवे होते. अजगर हा वन्यजीवांच्या अनुसूची १ मधील प्राणी आहे अशात त्याला असे फरफटत घेऊन जाणे एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. ही घटना छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक बाईक वेगाने पुढे जात असल्याचे दिसते आणि त्या बाईकच्या मागे दुचाकीला एक अजगर बांधून ठेवल्याचे नजरेस पडते. बाईक जसजशी पुढे जाते तसतसा अजगरही यासह वेगात रस्त्यावर ओढला जातो. अजगर कितीही धोकादायक प्राणी असला तरी त्याच्यासोबत हे कृत्य करणे क्रूरतेला जन्म देते. बाईकच्या मागे एका कारमध्ये बसलेला व्यक्ती हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करतो आणि ते सोशल मीडियावर शेअर करतो. (python)व्हिडिओ व्हायरल होताच आता लोक या घटनेवर आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत असून युजर्सद्वारे आता व्यक्तीवर गंभीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

अजगरासोबत घडलेल्या या अमानुष कृत्याचा व्हिडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्युज मिळाले असून युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एका युजरने लिहिले आहे, “या लोकांना देवाची भीती नाही वाटत का” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जो व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तो हे थांबवू शकत नव्हता का” आणखीन एका युजरने लिहिले आहे, (python)“दु:खद, कठोर कारवाई झाली पाहिजे”.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष