इचलकरंजी
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे (festival)शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित करण्यात आलेल्या ५८ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राज्य व राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू मा. मेघा काटकर यांच्या शुभहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर ज्योत प्रतिष्ठापना व पूजन करून पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मा. करिश्मा शेख पोलीस उपनिरीक्षक, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे शहर या प्रमुख उपस्थित तसेच मा. श्री. अहमद मुजावरसो विश्वस्त श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटी, इचलकरंजी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. (festival)विद्यार्थिनींनी क्रीडाशपथ घेतली. यावेळी क्रीडागीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व मनोगत मुख्याध्यापिका मा. सौ. ए. एस. काजी मॅडम यांनी व्यक्त केले. पाहुण्यांची ओळख श्री. डी. डी. कोळी सर यांनी करून दिली.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना क्रीडेमधील शिस्त, चिकाटी व संघभावनेचे महत्त्व सांगत क्रीडास्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषण मा. श्री. अहमद मुजावरसो यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. व्ही. एस. लोटके उपमुख्याध्यापिका यांनी मानले.

मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (festival)सौ. एस. पी. धातुंडे मॅडम यांनी केले. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे प्रशालेच्या क्रीडा परंपरेला दरवर्षीप्रमाणे पुन्हा नवे बळ मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. सदर क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला लाभलेल्या दोन्ही प्रमुख उपस्थित मा. मेघा काटकर व मा. करिश्मा शेख या गंगामाई प्रशालेच्याच माजी विद्यार्थिनी होत्या. विविध क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या माजी विद्यार्थिनींना वार्षिक समारंभासाठी आमंत्रित करण्याची गौरवशाली परंपरा प्रशालेने कायम राखली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य श्री. व्ही. जी. पंतोजी सर, पर्यवेक्षक श्री. एस. एस. कोळी सर, पर्यवेक्षिका सौ. एन. एम. कांबळे मॅडम क्रीडाशिक्षक श्री. के. ए. पाटील सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा :
नागरिकांनो सावधान! हिवाळ्यात वाढतेय पाठदुखीची समस्या, अशी घ्या काळजी
ऐन निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळाचे सर्वात 4 मोठे निर्णय; चौथ्या निर्णयाने सगळेच अवाक्!
राज- उद्धव ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांच मोठं भाष्य! म्हणाले…