शिव-शाहू विकास आघाडीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे शिवसेना (group) उबाठा पक्ष स्वबळावर इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. याबाबतची घोषणा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.‘पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावर किमान २५ ते ३० जागांवर उमेदवार उभे करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. चौगुले म्हणाले, ‘प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून शिव-शाहू विकास आघाडीत होतो.

त्यांच्याकडे आम्ही किमान १५ जागांची मागणी केली होती. (group) त्यामध्ये तडजोडीने किमान ८ ते १० जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात केवळ दोन जागा आम्हाला देण्याची तयारी दर्शवली. यामुळे पक्षातील बहुतांश कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, त्याला ‘मातोश्री’ वरून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही किमान २५ ते ३० जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. तसेच पक्षवाढीलाही मदत होणार आहे.’ यावेळी मलकारी लवटे, आनंदा शेट्टी, सागर जाधव, रतन वाझे, अजय घाडगे, लक्ष्मण पाटील, अभिजित लोले, संतोष लवटे आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या या निर्णयामुळे शिव-शाहू विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.(group) महाविकास आघाडीप्रणित या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा हे प्रमुख घटक पक्ष होते. पण, त्यातील शिवसेना उबाठा पक्षाने आघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा केल्यामुळे शिव-शाहू विकास आघाडीला धक्का बसला आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग शहरातील विविध भागांत आहे. त्यांच्या मताचा लाभ शिव-शाहू विकास आघाडीला झाला असता. मात्र, आता या निर्णयाचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!