इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी (public) माघारीचे चित्र उद्या (शुक्रवार, ता. २) स्पष्ट होताच प्रचाराचा धुरळा उडणार आहे. माघारीनंतर प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार असून शहरात राजकीय हालचालींना चांगलाच जोर चढणार आहे. येत्या काही दिवसांत दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा रंगणार असून, त्याचबरोबर प्रभागनिहाय कॉर्नर सभांमधून स्थानिक नेते थेट मतदारांशी संवाद साधताना दिसणार आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रचारासाठी आवश्यक त्या जागा निश्चित केल्या आहेत. शहरातील विविध भागांमध्ये जाहीर सभांसाठी आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तब्बल १०१ जागा कॉर्नर सभांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. एकाचवेळी जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहीर सभा आणि कॉर्नर सभा या प्रचाराच्या प्रभावी माध्यम ठरत असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार यावर भर देताना दिसत आहेत.

जाहीर सभांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याने (public)अनेकदा राजकीय वातावरणात बदल घडून येतो. त्यामुळेच नामवंत आणि स्टार प्रचारकांच्या सभांकडे विशेष लक्ष असते. दुसरीकडे, कॉर्नर सभांमधून स्थानिक प्रश्न, प्रभागातील विकासकामे आणि मतदारांच्या अडचणी थेट मांडल्या जात असल्याने या सभांनाही मोठे महत्त्व आहे. या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने वैयक्तिक भेटीगाठींसह अशा सभांचा प्रचारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

महापालिकेच्या निवडणूक विभागाने या सर्व सभांसाठी नियमावलीही ठरवून दिली आहे. (public)सभेसाठी जागा मागणी करताना प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून, कोणत्याही सभेसाठी परवानगीचा अर्ज किमान दोन दिवस आधी सादर करणे बंधनकारक आहे. कॉर्नर सभांसाठी साधारण दोन तासांची परवानगी दिली जाणार असून, दोन सभांमध्ये किमान दोन तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे. विनाकारण एकापेक्षा अधिक अर्ज करून जागा अडवण्यास मनाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी आठवडा बाजार भरत असल्यास त्या ठिकाणी बाजाराच्या वेळेनुसार सभेसाठी परवानगी दिली जाणार आहे.या सर्व तयारीमुळे इचलकरंजीतील निवडणूक प्रचार निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, पुढील काही दिवस शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध

नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी

 ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला