आयपीएल 2008 मध्ये हरभजन सिंह आणि श्रीसंत यांच्यात आयपीएलमदरम्यान(sports news) झालेल्या ‘थप्पड कांड’ ची खूप चर्चा झाली होती. या घटनेनंतर दोघांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र आता जेव्हा हरभजन आणि श्रीसंतमध्ये सर्वकाही ठीक झालं असताना ललित मोदीने दोघांमधील या वादाचं व्हिडीओ फुटेज समोर आणलं आहे. प्रकरण निवळत असताना तब्बल 17 वर्षांनी ललित मोदीने समोर आणलेल्या या व्हिडीओमुळे माजी गोलंदाज हरभजन सिंह भडकला आहे.

हरभजन सिंहने इंस्टेंट बॉलीवुडशी बोलताना म्हटले की, ‘ज्या प्रकारे हा व्हिडीओ लीक करण्यात आला ते चुकीचे आहे. असं व्हायला नको होतं. यामागे त्यांचा स्वार्थ असू शकतो. 18 वर्षांपूर्वी जे झालं ते लोक विसरले आहेत आणि हे लोकांना त्याची पुन्हा आठवण करून देत आहेत. जे काही झालं, त्याबद्दल मला वाईट वाटतंय. आम्ही खेळत होतो आणि प्रत्येकाच्या मनात काहीतरी चाललं होतं. चुका झाल्या आणि आम्हाला त्याची लाजही वाटते.’

हरभजन सिंहने(sports news) पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हटले की त्यांनी चूक केली आहे. हरभजन सिंहने सांगितले की, ‘हो, व्हिडीओ व्हायरल होतोय. ही एक दुर्दैवी घटना होती आणि मी अनेकदा सांगितले आहे की मी चूक केली आहे. माणसे चुका करतात आणि मीही चूक केली आहे. मी पुन्हा चूक केल्यास मला क्षमा करावी अशी मी भगवान गणेशाला प्रार्थना केली आहे’.

वर्ष 2008 मध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्स 11 पंजाबमध्ये झालेल्या एका सामन्यादरम्यान हरभजन सिंहने वेगवान गोलंदाज एस श्रीसंतच्या खानाखाली वाजवली होती. ज्याला ‘थप्पड कांड’ किंवा ‘थप्पड गेट’ म्हणून ओळखले जाते. आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी हरभजन आणि श्रीसंत यांच्यातील घटनेचे न पाहिलेले फुटेज प्रसिद्ध केले आहे. ललित मोदी यांनी ऑस्ट्रेलियन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार मायकेल क्लार्कसोबत Beyond23 क्रिकेट पॉडकास्टवर हे फुटेज शेअर केले आहे.

ललित मोदीने या घटनेचा व्हिडीओ दाखवण्यापूर्वी म्हटले की, ‘खेळ संपला होता, कॅमेरा बंद झाले होते. माझा एक सिक्योरिटी कॅमेरा सुरु होता. त्याने श्रीसंत आणि हरभजन सिंहमध्ये झालेली घटना कॅप्चर केली. यात दिसले की कशाप्रकारे भज्जीने त्याला कानाखाली मारली. मी हा व्हिडीओ बाहेर रिलीज केला नव्हता’.

हेही वाचा :

मराठा आंदोलनावर हायकोर्टात तातडीची सुनावणी! सुट्टी रद्द करून कोर्ट उघडले

बहीण तरूणाच्या प्रेमात पडली, भावाच्या डोक्यात हैवान घुसला, चाकूच्या धाकावर दोनदा बलात्कार

‘मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून…’; मराठा आंदोलनाबाबत सदावर्तेंचा हायकोर्टात मोठा युक्तिवाद