नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी (message)अनेकजण व्हॉट्सअॅपवरुन, सोशल मीडियावरुन मेसेज पाठवतात. या मेसेजच्या माध्यमातून तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता आहे. मात्र, आज रात्रीपासूनच सायबर गुन्हे होण्याची शक्यता आहे. यामुळेच पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पालीच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. तुम्ही जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा पाठवता. मात्र, यामुळे होणाऱ्या आर्थिक फसवणूकीपासून वाचा. सतर्क राहा आणि सुरक्षित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

व्हॉट्सअॅपवर तुम्हाला Happy New Year या नावाने (message)एखादी APK File, PDF किंवा Document File येऊ शकते.कोणत्याही नंबरवरुन आलेली ही अशी फाइल इन्स्टॉल किंवा ओपन करु नका. हा मेसेज कोणत्याही नंबरवरुन येऊ शकतो. याचाच अर्थ असा की, तुमचा मोबाईल आधीच हॅक झालेला असू शकतो.जर तुम्ही ही APK फाइल ओपन केली तर तुमचा फोन हँग होतो आणि तुमच्या फोनचे नियंत्रण हॅकर्सकडे जाते. तुमच्या फोनवरुन हाच मेसेज, व्हायरल इतर ग्रुपवर पाठवला जाईल.

यानंतर फोन पे, गुगल पे, अॅमेझॉन यासारखे अॅपदेखील हॅक होती. (message)यानंतर तुमच्या खात्यातील पैसे काढले जाऊ शकतात. तुमचे पैसे डेबिट झाल्याचे मेसेजदेखील डिलिट करतात. यामुळे तुम्हाला काहीच कळत नाही.जर एपीके फाइल डाउनलोड करताना मोबाईल हँग झाला तर फोनचे नेट किंवा वायफार बंद करा. यानंतर संशयास्पद फाइल डिलिट करा.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य