नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वांनी जोरदार तयारी केली असून सर्वजण (delivery) स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पण या आनंदोत्सवात अडथळा येण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना आणि पार्टीसाठी लागणारे साहित्य मागवणाऱ्यांना आज फटका बसू शकतो.आज स्विगी, झोमॅटो, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्डची डिलिव्हरी सर्व्हिस आज बंद असणार आहे. कारण या डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी हॉटेलमधून जेवण ऑर्डर करणार असाल आणि काही वस्तू ऑनलाइन मागवणार असाल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन (delivery) ऑफ अ‍ॅप बेस्ट ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता आणि हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, इंदूर आणि पटना सारख्या टियर-टू शहरांमधील डिलिव्हरीवरही काहीसा परिणाम होऊ शकतो.देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील प्रादेशिक संघटनांनीही या संपात सहभाग घेतला आहे. त्यांनी दावा केला आहे की, देशभरातील १,००,००० हून अधिक डिलिव्हरी कामगार आज अॅपमध्ये लॉग इन करणार नाहीत किंवा मर्यादित काळासाठी सक्रिय राहतील. त्यामुळे याचा परिणाम आज याठिकाणी ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे.

Zomato, Blinkit and Swiggy च्या कामगारांना मिळणार जीवन (delivery) आणि अपघात विम्याचा लाभ, केंद्र सरकारचा निर्णयमहत्वाचे म्हणजे या सर्व ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांनी यापूर्वी ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला संप केला होता. युनियनचे म्हणणे आहे की, गिग कामगारांच्या वाढत्या मागण्या असूनही त्यांच्या कामाच्या सवयी अजूनही बदललेल्या नाहीत. कंपन्या त्यांना पुरेसे पैसे देत नाहीत किंवा सुरक्षिततेची हमी देत ​​नाहीत.डिलिव्हरी कामगारांच्या या वाईट परिस्थितीचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. फक्त १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे गिग कामगारांना रस्ते अपघातांचा धोका निर्माण होतो. दिवसरात्र ऊन, थंडी आणि पाऊस यामध्ये वेळेत वस्तू पोहोचवूनही त्यांना त्यांच्या कंपन्यांकडून अपघात विमा, आरोग्य विमा आणि पेन्शनसारखे फायदे दिले जात नाहीत.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य