संपूर्ण जग २०२६ या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.(signs) अनेक जण या वर्षाकडून मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत, तर काहींनी आयुष्यात बदल घडवण्यासाठी नव्या संकल्पांची आखणीही केली आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ हे वर्ष सर्वांसाठी सारखं नसेल. कारण या वर्षात गुरू ग्रह आपली चाल बदलणार असून, त्याचा थेट परिणाम सर्व राशींवर होणार आहे. काही राशींसाठी हे गोचर अत्यंत लाभदायक ठरणार असलं, तरी एका राशीसमोर मोठं संकट उभं राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरू ग्रहाला ज्ञान, संपत्ती, विस्तार आणि भाग्याचा कारक मानलं जातं. २०२६ साली २ जून रोजी गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल, तर त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी तो सिंह राशीत गोचर करणार आहे. या ग्रहस्थितीमुळे काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, तर काही राशींना संयम, सावधगिरी आणि आत्मपरीक्षणाची गरज भासणार आहे.

गुरू ग्रहाच्या गोचरामुळे २०२६ मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी चांगले (signs) दिवस सुरू होऊ शकतात. या वर्षात पूर्वजांची संपत्ती मिळण्याची शक्यता असून, कुटुंबाकडूनही भक्कम पाठिंबा मिळेल. घरगुती सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि अनेक रखडलेली स्वप्नं पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी, परदेशात असलेल्या व्यक्तींना मायदेशी परतण्याचा योग जुळून येऊ शकतो.

वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. घरात धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. परदेशी स्त्रोतांमधून धनलाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात अनुभव आणि बुद्धीच्या जोरावर तुमचं स्थान अधिक भक्कम होईल. काही लोकांसाठी घर किंवा मालमत्ता खरेदीचा योगही संभवतो.

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचं गोचर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. गुंतवणुकीसाठी योग्य संधी उपलब्ध होतील आणि त्यातून चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबासाठी हे वर्ष समाधानकारक ठरेल. नोकरीत प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि पगारवाढीचे संकेत मिळत आहेत.

२०२६ मध्ये गुरू ग्रहाच्या गोचराचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम वृश्चिक राशीच्या लोकांवर होऊ शकतो. या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात काहींना यश मिळेल, मात्र आळस आणि निष्काळजीपणामुळे अनेक महत्त्वाच्या संधी हातातून निसटू शकतात. कामाच्या ठिकाणी अडथळे, गैरसमज आणि मानसिक तणाव वाढू शकतो.

विशेषतः वाहन चालवताना वृश्चिक राशीच्या लोकांनी अधिक काळजी घ्यावी,(signs) कारण अपघाताचा धोका वाढलेला आहे. आरोग्य, काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखणं अत्यंत गरजेचं ठरेल. संयम, शिस्त आणि सतर्कता ठेवली तरच या कठीण काळावर मात करता येईल. २०२६ हे वर्ष वृश्चिक राशीसाठी परीक्षा घेणारं ठरणार असून, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य