मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील(Jarange Patil) यांचे दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज त्याचा पाचवा दिवस आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.

आंदोलनासाठी न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे जरांगे पाटील यांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच मनोज जरांगे पाटील(Jarange Patil) यांनी माध्यमांशी केलेल्या काही वक्तव्यांची दखल घेत ती नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा कोअर कमिटीने केला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याने मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.
न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे जरांगे पाटील यांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस देत मैदान तातडीने रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी केलेल्या काही वक्तव्यांची दखल घेऊन त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा कोअर कमिटीने केला आहे.

मुंबई पोलिसांची नोटीस
प्रति:
आमरण उपोषण, अंतरवाली सराटी
ता. अंबड, जि. जालना
सदस्य:
१) श्री. किशोर आबा मरकड (कोर कमिटी सदस्य)
२) श्री. पांडुरंग तारक (कोर कमिटी सदस्य)
३) श्री. शैलेंद्र मरकड (कोर कमिटी सदस्य)
४) श्री. सुदाम बष्पा मुकणे (कोर कमिटी सदस्य)
५) श्री. बाळासाहेब इंगळे (कोर कमिटी सदस्य)
६) अॅड. अमोल लहाणे (कोर कमिटी सदस्य)
७) श्री. श्रीराम कुरणकर (कोर कमिटी सदस्य)
८) श्री. संजय कटारे (कोर कमिटी सदस्य)
परवानगी व अटी
आपल्या अर्जानुसार, दि. २९/०८/२०२५ रोजी सकाळी ०९:०० ते सायं. १८:०० वाजेपर्यंत आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी या कार्यालयाच्या पत्र क्र. ७६०८/२०२५ (दि. २७/०८/२०२५) अन्वये देण्यात आली.
परवानगी देताना –
“जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५” (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात लागू असलेले) याची माहिती आपणास देण्यात आली होती.तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. २६/०८/२०२५ रोजीच्या आदेशाची प्रतही आपणास देण्यात आली होती.
न्यायालयाचे निर्देश (दि. २६/०८/२०२५)
मा. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ (अॅमी फाउंडेशन विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर) मध्ये खालीलप्रमाणे आदेश दिले होते –
१) प्रतिवादी क्र. ०५, ०६ व ०७ (आपण स्वतः, श्री. विरेंद्र पवार व आमरण उपोषण अंतरवाली सराटी) यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५” अन्वये सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.
२) आंदोलन करावयाचे असल्यास, त्यासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
३) मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून शासनाने खारघर, नवी मुंबई येथे आंदोलनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.
४) सक्षम प्राधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास, त्यांच्या सर्व अटी व शर्तींचे पालन प्रतिवादींनी करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट
शाहरुखची लेक सुहाना खान अडचणीत…
आज अनेक शुभ योग; ‘या’ 5 राशींवर गौराईची मोठी कृपा, धनलाभाचे संकेत