कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या जानेवारी महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अगदी काही तासात डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांना धक्का देण्यासाठी टेरिफ कार्ड(court) वापरले. भारतासह अनेक देशांना त्यांनी भरमसाठ आयात शुल्क लावले. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला. त्याला भारतासारखा देशही अपवाद राहिला नाही. भारतावर तर त्यांनी पेनल्टीसह 50 टक्के आयात शुल्क लावले आहे.

या टेरिफ कार्ड धोरणाचा अमेरिकेवर सुद्धा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो हे विसरून गेलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यायालयाने(court) जमिनीवर आणले आहे. अशा प्रकारचे भरणसाठ आयात शुल्क लावण्याचा ट्रम्प यांना अधिकार नाही. असे कारण देत त्यांचे हे टेरिफ कार्ड न्यायालयाने रद्द ठरवले आहे. कनिष्ठ न्यायालयाचा अमेरिकन अध्यक्षांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात असले तरी अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
न्यायालयात(court) पुढे काय होईल हे आत्ता सांगता येत नसले तरी ट्रम्प महाशयांना चपराक मात्र नक्की बसली आहे. टेरिफ कार्ड जसे न्यायालयाला योग्य वाटलेली नाही तसेच ते अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेलाही पटलेले नाही. जगातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत.
चीनमध्ये नुकतीच शांघाय सहकार्य परिषद संपन्न झाली. या परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन, चीनचे सर्वेसर्वा जिनपिंग शिंग आणि नरेंद्र मोदी या तीन प्रभावी नेत्यांनी ट्रम्प यांच्या दबावाच्या राजकारणाला शह देण्याचा निर्धार केलेला आहे. या तीन नेत्यांनी एकत्र येणे हे ट्रम्प यांना शुभ संकेत नाहीत. उलट ते नजीकच्या काळात अडचणीत येऊ शकतात.
चीनचे प्रमुख जीन पिन शिंग आणि नरेंद्र मोदी यांची तब्बल सात वर्षानंतर या परिषदेच्या निमित्ताने भेट झाली आणि लडाख तसेच द्विपक्ष संबंधावर या दोन नेत्यांची तासभर चर्चा झाली. या सहकार्य परिषदेच्या निमित्ताने भारत आणि चीन यांच्यात संवादाला सुरुवात झाली हे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षात या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. सीमेवर वारंवार तणावाचे प्रसंग तयार झाले होते. विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने पाकिस्तानशी चार दिवसांचे अघोषित युद्ध करून पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले होते तेव्हा चीनने पाकिस्तानची बाजू घेऊन भारताला डीवचले होते. यादरम्यान चीन आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी बिघडले होते.
भारताचा खरा शत्रू कोण यावर जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा भारतातील आंतरराष्ट्रीय विश्लेषक तसेच युद्ध अभ्यासक हे नेहमीच भारताचा क्रमांक एकचा शत्रू चीन असल्याचे सांगत असतात. पाकिस्तान हा क्रमांक एकचा शत्रू नसून भारताला खरा धोका चीन पासून असल्याचे यापूर्वी अनेकदा चर्चेत सांगितले गेले आहे. या एकूण पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये 50 मिनिटांची चर्चा होणे हे आश्वासक मानले जाते.

भारताचे चीन बरोबरचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची शक्यता किंवा आशा या दोन नेत्यांमधील चर्चेने पल्लवीत झालेल्या आहेत. पाकिस्तान बरोबर संबंध अतिशय चांगले गेलेले असताना चीनबरोबर संबंध सुधारणे हे अतिशय चांगले घडलेले आहे असे म्हणता येईल.
डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा विकास थांबवायचा आहे किंवा त्यात अडसर आणावयाचा आहे(court). तुम्ही रशियाबरोबरचे व्यापार थांबवले पाहिजेत अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील असे सांगणाऱ्या ट्रम्प यांना अमेरिका रशियाकडून बरेच काही खरेदी करते हे माहीत नव्हते असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. पण आपल्याला हे माहीतच नाही असा आव आणत त्यांनी भारतावरचे आयात शुल्क कमालीचे वाढवले आहे.
टेरिफ शस्त्र वापरल्यामुळे भारत अडचणीत येईल. त्यामुळे तो आपल्या प्रभावाखाली येईल अशी अटकळ ट्रम्प महाशयांनी बांधली होती. पण नरेंद्र मोदी यांनी देशहिताशी तडजोड नाही अशी भूमिका घेऊन भारतीयांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आहे. दरम्यानच्या काळात ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही किंवा नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद करण्याचे टाळले हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा अहंकार दुखावला गेलेला आहे.
त्यामुळे ते भारतावर लाभलेले अवाजवी आयात शुल्क कमी करतील असे वाटत नाही. त्याचा आर्थिक फटका भारताला बसलेला आहे हे नाकारता येत नसले तरी भारतीय व्यापारी डगमगलेले दिसत नाहीत. तुमच्याशी आमचा व्यापार थांबला असला तरी आमचे काही बिघडत नाही. तुमचेच काही बिघडेल किंवा तुमचेच व्यापारी अडचणीत येतील. अमेरिकन नागरिकांना भारतीय वस्तू मिळणार नाहीत. असा एक संदेशच देशातील व्यापारी संघटनांनी अमेरिकेला दिलेला आहे.
या एकूण पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दादागिरीला शह देण्यासाठी भारत रशिया आणि चीन हे तीन देश एकत्र आलेले आहेत. हे तीन देश जगातील अनेक देशांना अमेरिके विरोधात एकत्र आणू शकतात आणि त्याचा मोठा फटका अमेरिकेला बसू शकतो.
भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारल्यामुळे किंवा सुधारणार असल्यामुळे पाकिस्तानला ते आवडणार नाही. पाकिस्तानला योग्य तो संदेश पोहोचलेला असल्यामुळे तेथील राज्यकर्ते शहाणपणा शिकतील.
हेही वाचा :
कोल्हापुरात गणेशोत्सवाला महास्वरूप केव्हा आले….?
राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट
आझाद मैदान तातडीने रिकामे करा..; जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस