सध्या परिस्थिती अत्यंत नाट्यमयरीत्या बदलते आहे. तरुणाई कर्ज घेतना मागेपुढे (addicted) विचार करत नाही आणि हेच कारण आहे की, व्याजदर वाढत आहेत. कर्ज फेडण्यास अडचणी येत आहे तसेच फेडण्याच्या क्षमते नसूनही कर्ज घेतल्याने अनियंत्रीत ताण वाढत आहे. क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज यांसारख्या विनाहमी विना गॅरंटी किरकोळ कर्जांमध्ये थकबाकी झपाट्याने वाढत असल्याची गंभीर माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय ने दिली आहे. सध्या एकूण किरकोळ कर्ज थकबाकीपैकी निम्म्याहून अधिक हिस्सा विनाहमी कर्जाचा आहे. कर्ज पोर्टफोलिओमध्ये विनाहमी कर्जाचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक असून, 35 वर्षांखालील कर्जदारांचा वाटा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अशा कर्जांमध्ये 36 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

आरबीआयच्या मते, तरुणाईमध्ये खर्चाची सवय, सहज उपलब्ध कर्ज, (addicted)डिजिटल अॅप्स आणि क्रेडिट कार्डांचा वाढता वापर यामुळे कर्ज घेणे सोपे झाले आहे. मात्र, उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचा भार वाढल्याने कर्जफेडीची क्षमता कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, थकबाकी वाढत असून बँकिंग व्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.आरबीआयच्या अहवालानुसार, विनाहमी कर्जांमध्ये विशेषतः क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जांची थकबाकी वेगाने वाढते आहे. 35 वर्षांखालील तरुण कर्जदारांचा मोठा वाटा, अनेक संस्थांकडून एकाच वेळी कर्ज घेण्याची प्रवृत्ती आणि फिनटेक कंपन्यांमार्फत सहज कर्ज उपलब्ध होणे, हे या संकटामागील प्रमुख कारणे आहेत. खासगी बँकांवर या कर्जांचा ताण सरकारी बँकांच्या तुलनेत जवळपास पाच पट अधिक आहे.
आरबीआयने फिनटेक कंपन्यांच्या भूमिकेवरही बोट ठेवले आहे. (addicted)पाच किंवा त्याहून अधिक बँका व वित्तसंस्थांकडून विनाहमी कर्ज घेतलेल्या कर्जदारांमध्ये कर्जफेडीची अडचण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सध्या अनेक बँका आणि फिनटेक कंपन्या वैयक्तिक कर्ज व क्रेडिट कार्डांवर जास्त अवलंबून असल्याचे दिसते. याच वेळी, मोठ्या कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जात अजूनही मंदी कायम असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.खासगी बँकांमध्ये विनाहमी कर्जाचा धोका अधिक असल्याने, पुढील काळात जोखमीचे व्यवस्थापन, कर्ज देताना काटेकोर तपासणी आणि ग्राहकांची कर्जफेड क्षमता तपासणे गरजेचे ठरणार आहे.

अन्यथा, वाढती थकबाकी बँकांच्या नफ्यावर आणि आर्थिक स्थैर्यावर (addicted)परिणाम करू शकते.विनाहमी कर्जांची वाढ ही तरुणाईसाठी तसेच बँकिंग व्यवस्थेसाठी इशारा आहे. सहज कर्ज मिळत असले, तरी त्याचा विवेकपूर्ण वापर, खर्चावर नियंत्रण आणि वेळेत कर्जफेड ही काळाची गरज आहे. आरबीआयने दिलेल्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने पाहत, बँका, फिनटेक कंपन्या आणि कर्जदारांनी मिळून जबाबदारीने पावले उचलल्यासच हे वाढते संकट रोखता येईल.
हेही वाचा :
रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध
नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी
‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला