नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.(meal) लहान मुलांच्या पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्याची किळसवाणी घटना घडली आहे. मुलांना कडकडीत भूक लागल्याने, भाजीतून कडीपत्ता वेगळा करावा या पद्धतीने मुलं अळ्या वेगळ्या करून जेवत असल्याचं उघडकीस आले आहे. या घटनेचा व्हिडिओ गावकऱ्यांनी आपल्या फोनमध्ये चित्रित केला आहे. दरम्यान या घटनेनंतर लहान मुलांच्या सासुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील किनवट(meal) तालुक्यातील इस्लापुर गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळून आल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना नियमितपणे दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ याचे व्हीडिओ चित्रीकरण केले. हे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
भयान वास्तव! नांदेडमध्ये झेडपीच्या शाळेच्या जेवणात आळ्या pic.twitter.com/e5XZFfT2ti
— Namdeo kumbharJanuary 3, 2026
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या (meal)अन्नामध्ये अळ्या दिसून येत असून, एक लहान मुलगी जेवताना भाजीतून टोमॅटो आणि कडीपत्ता जसा वेगळा करतात त्याप्रकारे अळ्या बाजूला करून जेवत असल्याचं पाहायला मिळत आहे. शालेय पोषण आहाराचा उद्देश विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे हा असताना, प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.या प्रकारामुळे पालकांमध्येही तीव्र नाराजी असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी नियमित तपासणी यंत्रणा सक्षम करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश