उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.(confront) एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणी भररस्त्यात भिडल्या. एका तरुणीने दुसरीच्या झिंज्या पकडून तिला भररस्त्यात खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. १ मिनिटात या तरुणीने दुसरीला ११ वेळा चापटी मारल्या. तसंच शिवीगाळ करत लाथाबुक्क्या देखील मारल्या. या तरुणींचा हा भररस्त्यातील हाय वोल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.’तू आधी माझ्या बॉयफ्रेंडला भाऊ म्हणायची, आता त्याला बाबू का म्हणतेस ते सांग आधी…’ असा जाब विचारत एका तरुणीने दुसऱ्या तरुणीचे केस धरले आणि तिला रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या व्हायरल व्हिडिओमध्ये ती कधी तिचे केस धरून ओढते, तर कधी तिला चापटी मारते तर कधी लाथा मारताना व्हायरल व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे.

ज्या तरुणीला मारहाण केली जात होती ती मदतीसाठी मागणी करताना दिसते.(confront) ती मारहाण करणाऱ्या तरुणीकडे देखील सोडण्याची मागणी करते पण ती तिचा एकही शब्द न ऐकता तिला मारतच सुटते. यावेळी मारहाण करणारी तरुणी पीडित मुलीला जाब विचारते आणि जोरजोरात ओरडताना देखील व्हिडीओत दिसत आहे. मारहाण करणाऱ्या तरुणीच्या मैत्रिणीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.कानपूरमधील यशोदा नगर बायपासवर ही हाणामारीची घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसणारी तरुणी बारा परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे एक मिनिटांच्या व्हिडिओमध्ये ती तरुणी दुसऱ्या तरुणीला किमान ११ वेळा चापटी मारते, दोनदा लाथा मारते आणि तिचे केस धरून रस्त्यावर ओढत नेते. महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकार रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक पाहत होते पण कुणीही तिच्या मदतीला धावून आले नाही.
दोन तरुणींमध्ये एका तरुणामुळे वाद झाला. मारहाण करणाऱ्या तरुणीचा आरोप आहे की,(confront) तिचे ज्या तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत त्यालाच ही तरुणी प्रपोज करत होती. यामुळे वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली. पीडित तरुणी मारहाण करणाऱ्या तरुणीच्या बॉयफ्रेंडला आधी भाऊ म्हणायची आणि ती आता त्याला बाबू म्हणते. त्यामुळे ती संतप्त होत तिला मारहाण करते. दोन्ही बाजूने अद्याप कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली नाही. पोलिसांना या व्हायरल व्हिडीओची माहिती मिळाली असून त्यामध्ये दिसणाऱ्या तरुणींचा ते शोध घेत आहेत. जर लेखी तक्रार मिळाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य