आजकाल स्मार्टफोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. (Airplane) फोनमधील अनेक फीचर्स आपण रोज वापरतो, पण काही फीचर्स असे असतात ज्यांचा खरा उपयोग आपल्याला माहीतच नसतो. त्यापैकीच एक फीचर म्हणजे Airplane Mode. बहुतांश लोकांना असं वाटतं की Airplane Mode फक्त विमानप्रवासातच वापरण्यासाठी असतो. मात्र, प्रत्यक्षात हा मोड रोजच्या वापरातही खूप फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग, Airplane Mode चे काही भन्नाट आणि उपयोगी फायदे जाणून घेऊया.

अनेक वेळा फोनमध्ये नेटवर्क नीट येत नाही, सतत लो(Airplane) सिग्नलची समस्या निर्माण होते किंवा कॉल ड्रॉप होतात. अशा वेळी फोन रीस्टार्ट करण्याऐवजी तुम्ही फक्त 10–15 सेकंद Airplane Mode ऑन करून पुन्हा ऑफ करू शकता. यामुळे फोन जवळच्या मोबाईल टॉवरशी पुन्हा कनेक्ट होतो आणि नेटवर्क रीसेट होते. हा एक सोपा आणि झटपट उपाय आहे.

फोन चार्ज करताना नेटवर्क आणि बॅकग्राउंड अ‍ॅप्समुळे बॅटरी वापरली जात राहते.(Airplane) त्यामुळे चार्जिंगचा वेग कमी होतो. जर तुम्ही फोन चार्ज करताना Airplane Mode ऑन केला, तर फोन सर्व नेटवर्कपासून डिस्कनेक्ट होतो. त्यामुळे बॅकग्राउंड अ‍ॅप्स बंद राहतात आणि फोन वेगाने चार्ज होतो. घाईत चार्ज करायचा असेल, तर हा ट्रिक नक्की वापरा.

कधी कधी फोन अचानक हँग होतो किंवा स्लो काम करतो. (Airplane) यामागे नेटवर्कशी संबंधित बॅकग्राउंड टास्क कारणीभूत असतात. अशा वेळी Airplane Mode काही वेळासाठी ऑन केल्यास, फोनचे नेटवर्क कनेक्शन बंद होते आणि अडकलेले टास्क थांबतात. त्यामुळे फोन पुन्हा स्मूथ चालू लागतो.Airplane Mode चालू केल्यावर फोन सर्व प्रकारच्या नेटवर्कपासून कट होतो. त्यामुळे कोणीही कॉल किंवा मेसेज करू शकत नाही. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही Airplane Mode ऑन ठेवूनही WiFi वापरू शकता. म्हणजेच, फोन पूर्णपणे बंद न करता तुम्ही तो शांत Silent/Offline मोडमध्ये ठेवू शकता आणि आवश्यक कामही करू शकता.

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश