फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश (elections) सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असून २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि पंचयती समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. २० जिल्हा परिषदेत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होतील, असा अंदाज वर्तवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी सर्वोच्च (elections)न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

कोण कोणत्या जिल्हा (elections) परिषदेच्या निवडणुका?
अहिल्यानगरअकोला
अमरावती
छत्रपती संभाजीनगर
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
हिंगोली
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
नागपूर
नांदेड
नंदुरबार
नाशिक
धाराशिव
पालघर
परभणी
पुणे
रायगड
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
ठाणे
वर्धा
वाशिम
यवतमाळ

हेही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश