राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या.(candidates) सायंकाळी ५.३० पर्यंत प्रचारासाठीचा कालावधी होता. पण प्रचाराचा कालावधी संपला असला तरी देखील उमेदवार प्रचार करू शकणार आहे. कारण निवडणूक आयोगाने त्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. उमदेवार प्रचाराचा कालावधी संपला तरी देखील घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. याबाबत निवडणूक आयोगाने परिपत्रक काढले आहे.निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, आज साडेपाच वाजल्यानंतरही उमेदवारांना प्रचार करता येणार आहे.(candidates) तसंच मतदानाच्या दिवशीही उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा असणार आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. फक्त उमेदवाराला कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करता येणार नाही. त्याचसोबत कोणतेही पत्रक न वाटता शांततेमध्ये उमेदवाराला प्रचार करता येईल. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी आणखी कालावधी मिळत असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

१३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार, (candidates) आचारसंहीता सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार/प्रतिनिधी यांना त्यांचा प्रचार १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यत करता येईल. परंतू १३ जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत राजकीय पक्ष/अपक्ष उमेदवार यांना त्यांचा प्रचार घरोघरी जाऊन करता येईल.
मात्र सदर राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवार/प्रतिनिधींना पत्रके वाटून प्रचार करता येणार नाही.(candidates) दरम्यान, राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश