कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज (secured) मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रभागात शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा तब्बल तीन हजार मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे, काँग्रेस नेते व आमदार सतेज पाटील यांची साथ सोडल्यानंतर देशमुख यांनी स्वतंत्र राजकीय ताकद सिद्ध केली आहे.या लढतीसाठी सतेज पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून जोरदार प्रचार केला होता. कोणत्याही परिस्थितीत देशमुख यांचा पराभव व्हावा, यासाठी काँग्रेसने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले. मात्र, मतदारांनी स्पष्ट कौल देत देशमुख यांच्या पारड्यात मतांचा कौल दिला.

त्यामुळे हा विजय केवळ संख्यात्मक नसून राजकीयदृष्ट्याही अत्यंत (secured) महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रभागात महायुतीने सर्व जागांवर विजय मिळवला आहे.दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील इतर प्रभागांमध्येही चुरशीचे निकाल समोर आले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचे अजय इंगवले यांनी काँग्रेसचे दत्ता टिपूगडे यांचा पराभव केला, तर भाजपच्या अर्चना उत्तम कोराने यांनी काँग्रेसच्या प्रणोती पाटील यांच्यावर विजय मिळवला.प्रभाग क्रमांक १ मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले असून, प्रभाग क्रमांक १० मधून जनसुराज्यचे अक्षय जरग यांनी बाजी मारली आहे.
यामुळे जन स्वराज्य शक्ती पक्षाने या निवडणुकीत खाते उघडत आपली (secured) उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचे बंधू राहुल इंगवले यांचा पराभव झाल्याने त्या गटालाही मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या दीपा मगदूम आघाडीवर असून भाजपच्या पूर्वा राणे पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.एकूणच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले असून, बदलत्या राजकीय समीकरणांची स्पष्ट झलक या निकालांतून पाहायला मिळत आहे.
ही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश