कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज ठरलेल्या (naming) लढतीत शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला, काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासमोर सतेज पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे राहुल माने यांनी तगडे आव्हान उभे केले होते. प्रचारात आणि सोशलमीडियावर आघाडीवर असलेले राहुल माने यांना मात्र मतांची आघाडी घेता आली नाही. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये देशमुख पिछाडीवर होते. मात्र, अखेरच्या फेऱ्यांत त्यांनी निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला.

शारंगधर देशमुख यांनी विजय मिळवल्यानंतर काँग्रेस नेते सतेज (naming) पाटील यांचे नाव न घेता टीका केली. “हा प्रभाग माझाच बालेकिल्ला आहे. इथून त्यांना मदत होती, मात्र तो त्यांचा बालेकिल्ला आहे असा गैरसमज झाला होता. तो आता दूर झाला आहे,” अशी फटकेबाजी देशमुख यांनी केली. तसेच, “माझी लढाई बावडेकरांविरुद्ध नव्हती, तर बावड्यातील एका नेत्याविरुद्ध होती,” असे स्पष्ट करत त्यांनी संघर्ष कुणाशी होता, हे सूचक विधान केले.

या प्रभागाकडे काँग्रेसने विशेष लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांनी या मतदारसंघात स्वतः लक्ष घालत प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. हा प्रभाग ऋतुराज पाटील यांच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघाशी निगडित असल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती. त्यामुळेच देशमुख यांच्यासमोर राहुल माने यांसारखा ताकदीचा उमेदवार देण्यात आला होता.

विशेष म्हणजे, एकेकाळी शारंगधर देशमुख हे सतेज पाटील यांचे (naming) ‘राईट हँड’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून नाराजीनाट्य घडल्यानंतर देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा बदल सतेज पाटील यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात होता. त्यानंतर आता प्रभाग ९ मधील हा विजय देशमुख यांच्यासाठी राजकीय पुनरागमनाचा आणि ताकद सिद्ध करणारा ठरला आहे.एकूणच, या निकालामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, प्रभाग ९ मधील ही लढत निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी ठरली आहे.

ही वाचा :

देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे

कोल्हापुरात महायुतीचा जोरदार प्रचार प्रारंभ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेचा उत्साह

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश